प्रातिनिधिक छायाचित्र freepik
लाईफस्टाईल

पिंपल्सपासून नैसर्गिक सुटका हवीये? वापरा डाळिंब!

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे अनेक तरुण-तरुणींना पिंपल्स किंवा ॲक्नेची समस्या सतावत आहे. विशेषतः किशोरवयीन आणि २०-३० वयोगटातील महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते.

Krantee V. Kale

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे अनेक तरुण-तरुणींना पिंपल्स किंवा ॲक्नेची समस्या सतावत आहे. विशेषतः किशोरवयीन आणि २०-३० वयोगटातील महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. चेहऱ्यावर उठणारे लालसर पिंपल्स, काळे डाग, त्वचेतील शुष्कपणा या सर्व गोष्टी सौंदर्यावर आणि आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम करतात.

अनेकजण पिंपल्सचा संबंध स्वच्छतेशी लावतात आणि वारंवार चेहरा धुणे, साबणांचा वापर यासारखे उपाय करतात. मात्र, चेहरा कितीही वेळा धुतला तरी पिंपल्स येतच राहतात. कारण ॲक्ने होण्याची मूळ कारणे वेगळी असतात - हार्मोन्सचे असंतुलन, त्वचेतील तेलग्रंथींची अतिशय सक्रिय क्रिया, बंद झालेले त्वचेचे छिद्र (पोअर्स) आणि बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव.

या समस्येवर उपाय म्हणून बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध असली, तरी काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. यामध्ये डाळिंब हे एक महत्त्वाचे फल आहे जे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही गुणकारी ठरते.

डाळिंबाचा पिंपल्सवर होणारा उपयोग

१. जळजळ कमी करते :

डाळिंबामध्ये नैसर्गिक अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेतील जळजळ कमी करण्यास मदत करतात. पिंपल्समुळे निर्माण होणारी सूज आणि लालसरपणा यावर डाळिंब अतिशय परिणामकारक ठरते.

२. पिंपल्सची वाढ थांबवते :

डाळिंबाचा गर थेट चेहऱ्यावर लावल्यास त्वचेतील ॲक्ने थांबते. त्याचा कोणताही साइड इफेक्ट नसतो आणि त्वचा मऊ व स्वच्छ दिसते.

३. बॅक्टेरिया नियंत्रण :

पिंपल्स होण्यामागे बॅक्टेरियांचा मोठा हात असतो. डाळिंबातील घटक हे त्वचेवरील हानिकारक बॅक्टेरियांची वाढ रोखतात. त्यामुळे नवीन पिंपल्स येण्याची शक्यता कमी होते.

डाळिंबाचा वापर कसा करावा?

डाळिंब खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेच, पण त्वचेसाठी त्याचा बाह्य वापर अधिक प्रभावी ठरतो. डाळिंबाची साल सुकवून त्याची बारीक पावडर करून घ्या. त्यामध्ये थोडं मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास त्वचा स्वच्छ होते, डाग कमी होतात आणि त्वचेला ताजेपणा येतो. याशिवाय, डाळिंबाचा ताजा रसही थेट चेहऱ्यावर लावता येतो. तो त्वचेमध्ये झिरपतो आणि आतील बॅक्टेरियावर प्रभाव टाकतो.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल