लाईफस्टाईल

Snacks For Navratri 2025 : नवरात्रीत उपवास करताय? मग 'या' काही सोप्या फ्रूट स्नॅक्स रेसिपी तुमच्यासाठीच

नऊ दिवस उपवास राखणं सोपं काम नाही. दिवसभर हलकीशी भूक भागवण्यासाठी काहीतरी झटपट मिळालं, तर उपवास टिकवणं आणि एनर्जी कायम ठेवणं दोन्ही शक्य होतं. आधीपासून तयार केलेले फ्रूट स्नॅक्स उपवास अधिक सोपा आणि आनंददायी करतात. म्हणूनच या काही सोप्या रेसिपी तुमच्यासाठी..

Mayuri Gawade

गणेशोत्सवाच्या आनंदानंतर लगेचच शारदीय नवरात्र उत्सव सुरू होतो, जो भक्तांसाठी खास असतो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला सुरू होणारा हा सण नऊ दिवस चालतो आणि या काळात देवीच्या नऊ रुपांची उपासना केली जाते. यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्री सुरू होत असून अनेक भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास ठेवणार आहेत.

नऊ दिवस उपवास राखणं सोपं काम नाही. दिवसभर हलकीशी भूक भागवण्यासाठी काहीतरी झटपट मिळालं, तर उपवास टिकवणं आणि एनर्जी कायम ठेवणं दोन्ही शक्य होतं. आधीपासून तयार केलेले फ्रूट स्नॅक्स उपवास अधिक सोपा आणि आनंददायी करतात.

हे स्नॅक्स बनवायला अगदी सोपी आहेत, काही वेळात तयार होतात आणि चविष्टही लागतात. तसेच हवाबंद डब्यात ठेवल्यास अनेक दिवस कुरकुरीत राहतात.

१. मखाना नमकीन

साहित्य:

  • २ कप मखाने

  • शेंगदाणे

  • १ चमचा तूप

  • सेंधा मीठ

  • अर्धा चमचा मिरीपूड

कृती:

  1. कढईत तूप गरम करा आणि त्यात मखाने कुरकुरे होईपर्यंत भाजा.

  2. थोडं तूप टाकून शेंगदाणे भाजून घ्या.

  3. मखाने व शेंगदाणे नीट भाजल्यावर त्यात मीठ आणि मिरीपूड घालून मिक्स करा.

  4. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.

२. केळ्याचे चिप्स

साहित्य:

  • कच्ची केळी

  • सेंधा मीठ

  • मिरीपूड

  • १ चमचा तूप किंवा शेंगदाणा तेल

कृती:

  1. केळी धुऊन सोलून जाडसर काप करा.

  2. कढईत तेल गरम करा आणि त्यात मीठाच्या पाण्याचे थेंब टाका.

  3. केळ्याचे काप सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

  4. वरून थोडं मीठ-मिरीपूड शिंपडा.

  5. हवाबंद डब्यात ठेवल्यास ८-१० दिवस कुरकुरीत राहतात.

३. बटाट्याचे चिप्स

साहित्य:

  • मोठे बटाटे

  • सेंधा मीठ

  • मिरीपूड

  • शेंगदाणा तेल

कृती:

  1. बटाटे सोलून पातळ स्लाइस करा आणि १५ मिनिटे पाण्यात भिजवा.

  2. नंतर स्वच्छ करून वाळवा आणि गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा.

  3. शेवटी मीठ-मिरीपूड टाकून मिक्स करा.

हे तिन्ही स्नॅक्स व्रताच्या काळात झटपट भूक भागवतील आणि दिवसभर ताजेतवाने ठेवतील. नवरात्रीत देवीची पूजा करताना तुमचं उपवासाचं जेवणही असं खास आणि रुचकर ठेवा!

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान