लाईफस्टाईल

Navratri 2025 : नवरात्रीत उपवासाला काहीतरी वेगळं हवंय? बनवा रताळ्याची कापं, खूपच सोपी रेसिपी

नवरात्रीमध्ये उपवास करताय? अशावेळी वेळ वाचवणारा आणि तितकाच पौष्टिक असणारा पदार्थ म्हणजे 'रताळ्याची कापं' कमीत कमी वेळेत बनणारा हा पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल. यासाठी सर्वप्रथम रताळी स्वच्छ धुवून...

Mayuri Gawade

शारदीय नवरात्रोत्सवाला अवघ्या दोन दिवसांत सुरुवात होत आहे. महिलांची नवरात्रीसाठी अगदी कपड्यांपासून ते उपवासापर्यंत खास लगबग सुरू असते. त्यातही उपवासासाठी रोज काय नवीन करायचं हा प्रश्न असतोच. अशावेळी वेळ वाचवणारा आणि तितकाच पौष्टिक पदार्थ फार उपयोगी ठरतो. साबुदाणा, बटाटे, वरी, शेंगदाणे खाऊन कंटाळा आलाय का? तर, रताळ्याची कापं तुम्हाला देईल वेगळेपण आणि चव दोन्हीचा अनुभव.

साहित्य :

  • रताळी - २

  • साखर - २ चमचे

  • तूप - २ टेबलस्पून

  • ड्रायफ्रुट्स - आवश्यक तेवढे, काप करून

  • वेलची पूड - चवीनुसार

कृती :

रताळी स्वच्छ धुवून साल काढा आणि त्याचे गोल काप करून घ्या. एका कढईत तूप गरम करून त्यात रताळ्याचे काप टाका. झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ काढा. त्यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड घालून चांगले मिक्स करा. रताळ्याचे काप आणखी पाच ते सहा मिनिटे हलक्या आचेवर परतून घ्या. शेवटी ड्रायफ्रूट्स घालून गरम गरम सर्व्ह करा.

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहतात? आता NHAI चा डिजिटल लोकल पास मिळवा RajmargYatra App वरून, जाणून घ्या डिटेल्स