लाईफस्टाईल

नवे वर्ष, नवा संकल्प! २८ दिवसांत ६ किलो वजन कमी करा; न्यूट्रिशनिस्टने दिला भन्नाट डाएट प्लान

न्यूट्रिशनिस्ट आयना सिंघल यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिनाभरात ६ किलो वजन कमी करण्यासाठी खास डाएट प्लान दिला आहे. त्यानुसार योग्य डाएट आणि हलक्या व्यायामामुळे वजन कमी होणे शक्य आहे, आणि हा प्लान फक्त वजन कमी करण्यापुरता मर्यादित नसून शरीराला आतून मजबूत करण्यास देखील मदत करतो...

Mayuri Gawade

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेकजण ठरवतात, "ह्या वर्षात वजन कमी करायचं" पण काही दिवसांतच डाएटचा कंटाळा, वेळेची कमतरता आणि चुकीच्या सवयी यामुळे हा संकल्प मागे पडतो. वजन कमी करायचं म्हटलं की उपाशी राहणं, एकाच प्रकारचं अन्न खाणं किंवा तासन्‌तास जिममध्ये घाम गाळणं असे गैरसमज बहुतेक लोकांच्या मनात येतात.

तरीही योग्य पद्धतीने, शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि शरीराच्या गरजेनुसार डाएट केल्यास वजन कमी करणे इतके कठीण नाही. न्यूट्रिशनिस्ट आयना सिंघल यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिनाभरात ६ किलो वजन कमी करण्यासाठी खास डाएट प्लान दिला आहे. त्यानुसार योग्य डाएट आणि हलक्या व्यायामामुळे वजन कमी होणे शक्य आहे, आणि हा प्लान फक्त वजन कमी करण्यापुरता मर्यादित नसून शरीराला आतून मजबूत करण्यास देखील मदत करतो.

सकाळची सुरुवात -

सकाळी रिकाम्या पोटी ओव्या-जिरे पाणी प्याल्याने चयापचय क्रिया वाढते, पोटफुगी कमी होते आणि दिवसभराची भूक नियंत्रित होते. दुसऱ्या दिवशी मेथीच्या बियांचे पाणी पिणे पचनक्रिया सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. तसेच आले आणि लिंबू पाणी प्याल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

सकाळी भिजवलेले ५ बदाम, १ अक्रोड किंवा अर्धा कप दही खाल्याने प्रोटीन मिळतो आणि ऊर्जा टिकवली जाते.

रात्रीची काळजी : पचनक्रिया आणि झोप सुधारण्यासाठी

रात्री हळद व काळी मिरी घालून कोमट पाणी प्याल्याने शरीरातील जळजळ कमी होते. दालचिनीचे पाणी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. जेवणानंतर बडीशेप खाल्याने पचन सुरळीत होते.

जेवणात काय समावेश करावा

  • प्रथिनासाठी: डाळ, चीज, टोफू, दही किंवा अंडी

  • फायबरसाठी: दुधी भोपळा, भेंडी, गाजर, काकडी, हिरव्या भाज्या

  • कार्बोहायड्रेट्स: कमी प्रमाणात घेणे

पोट फुगले किंवा गॅस असल्यास चिया सीड्सचे पाणी उपयुक्त ठरते. गॅस आणि ॲसिडीटीसाठी आले-बडीशेप पाणी प्यावे. नारळ पाणी, पपई, पेर सारखी हंगामी फळे आतड्यांचे आरोग्य सुधारतात.

नियमित पालन केल्यास परिणाम निश्चित

या सर्व गोष्टी नियमितपणे फॉलो केल्यास महिनाभरात सहज ६ किलो वजन कमी होऊ शकते. योग्य डाएट, सकाळचा रूटीन आणि रात्रीची काळजी घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते आणि नवीन वर्षाचा आरंभ अधिक उत्साहपूर्ण होतो.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग