झोपताना केसांची काळजी घ्या! मोकळे केस की सैल वेणी, कोणता पर्याय योग्य? तज्ज्ञ सांगतात... 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

झोपताना केसांची काळजी घ्या! मोकळे केस की सैल वेणी, कोणता पर्याय योग्य? तज्ज्ञ सांगतात...

तज्ज्ञांच्या मते, केसांचा प्रकार आणि लांबी लक्षात घेऊन झोपण्याची सवय ठरवणे महत्त्वाचे आहे.

किशोरी घायवट-उबाळे

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेतली जाते, मात्र केसांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. झोपताना केस मोकळे ठेवावेत की वेणी घालावी, याबाबत अनेक महिलांच्या मनात संभ्रम असतो. ही छोटीशी सवय केसांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकते. योग्य पद्धतीने केस बांधल्यास केस तुटणे, गुंतणे आणि गळणे कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, केसांचा प्रकार आणि लांबी लक्षात घेऊन झोपण्याची सवय ठरवणे महत्त्वाचे आहे.

झोपताना मोकळे केस ठेवण्याचे फायदे

  • मोकळे केस ठेवल्याने टाळूला हवा मिळते आणि घाम-ओलावा कमी साचतो.

  • कोंडा आणि खाज येण्याचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

  • केसांच्या मुळांवर ताण येत नसल्याने केस तुटण्याची शक्यता कमी होते.

  • लांब आणि दाट केस असलेल्या महिलांसाठी हा पर्याय अधिक आरामदायी ठरू शकतो.

मोकळे केस ठेवण्याचे तोटे

  • झोपेत हालचाल झाल्यामुळे केस उशीवर घासले जातात.

  • केस गुंतणे, गाठी पडणे आणि फ्रिझी होण्याची शक्यता वाढते.

  • सकाळी केस विस्कटलेले दिसू शकतात.

सैल वेणी घालण्याचे फायदे

  • केस गुंतण्यापासून संरक्षण मिळते.

  • केस तुटण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

  • सकाळी केस व्यवस्थित राहतात आणि सेट करणे सोपे जाते.

  • लांब केसांसाठी हा पर्याय अधिक सोयीचा ठरतो.

घट्ट वेणी का टाळावी?

केस खूप घट्ट बांधल्यास टाळू आणि केसांच्या मुळांवर ताण येतो. त्यामुळे केस गळणे, हेअरलाइन मागे जाणे आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नेहमी सैल वेणी घालावी आणि रबरबँडऐवजी मऊ स्क्रंची किंवा कापडी रिबनचा वापर करावा.

झोपण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स :

  • केसांची घट्ट वेणी घालणे टाळा.

  • मऊ स्क्रंची किंवा कापडी रिबन वापरा.

  • ओले केस कधीही बांधू नका किंवा तसेच झोपू नका.

  • रेशमी किंवा मऊ सूती उशीचे कव्हर वापरल्यास घर्षण कमी होते.

  • झोपण्यापूर्वी थोड्या प्रमाणात हेअर सीरम किंवा हलके हेअर ऑइल लावल्यास केसांमधील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

तज्ज्ञांचे मत:

प्रत्येकाच्या केसांचा प्रकार वेगळा असतो. त्यामुळे केस खूप घट्ट बांधण्याऐवजी सैल वेणी हा बहुतेकांसाठी अधिक सुरक्षित आणि केसांच्या आरोग्यास पूरक पर्याय मानला जातो.

(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर

LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

कर्जतमध्ये १०० एकरावर ‘अनंत आश्रय’; अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी वसाहत; पाच हजारांसाठी आयुष्यभराचा निवारा

Mumbai : काजू-अंजीर कतली, बर्फीनेही खाल्ला भाव; खरेदीसाठी आधीच बुकींग