सुंदर आणि निरोगी त्वचेचा मंत्र; झोपण्यापूर्वी 'अशी' घ्या त्वचेची काळजी (Photo-Yandex)
लाईफस्टाईल

सुंदर आणि निरोगी त्वचेचा मंत्र; झोपण्यापूर्वी 'अशी' घ्या त्वचेची काळजी

तज्ज्ञांच्या मते, झोप ही त्वचेच्या पुनरुज्जीवनाची नैसर्गिक प्रक्रिया असून, योग्य स्किनकेअर रूटीनमुळे त्वचा अधिक निरोगी, तजेलदार आणि चमकदार राहू शकते.

किशोरी घायवट-उबाळे

दिवसभर धूळ, प्रदूषण, ताणतणाव आणि मेकअप यांचा त्वचेवर परिणाम होत असतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते. तज्ज्ञांच्या मते, झोप ही त्वचेच्या पुनरुज्जीवनाची नैसर्गिक प्रक्रिया असून, योग्य स्किनकेअर रूटीनमुळे त्वचा अधिक निरोगी, तजेलदार आणि चमकदार राहू शकते.

झोपण्यापूर्वी सर्वप्रथम चेहरा सौम्य क्लीन्झरने स्वच्छ करणे गरजेचे आहे. यामुळे त्वचेवरील धूळ, तेलकटपणा आणि मेकअप पूर्णपणे निघून जातो. चेहरा स्वच्छ न करता झोपल्यास रोमछिद्रे बंद होऊन पिंपल्स, ब्लॅकहेड्ससारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे क्लीन्झिंग ही स्किनकेअरची पहिली आणि महत्त्वाची पायरी मानली जाते.

क्लीन्झिंगनंतर त्वचेच्या प्रकारानुसार टोनर आणि मॉइश्चरायझर वापरणे फायदेशीर ठरते. टोनरमुळे त्वचेचा पीएच बॅलन्स राखला जातो, तर मॉइश्चरायझर त्वचेला आवश्यक ओलावा देतो. कोरडी त्वचा असेल तर जाडसर क्रीम, तर तेलकट त्वचेसाठी हलका जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

रात्रीच्या वेळी नाईट क्रीम किंवा सीरमचा वापर केला तर त्वचेला अतिरिक्त पोषण मिळते. व्हिटॅमिन C, रेटिनॉल किंवा हायल्युरॉनिक अॅसिडयुक्त उत्पादने त्वचेच्या दुरुस्तीला मदत करतात. मात्र, कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

यासोबतच पुरेशी झोप, भरपूर पाणी पिणे आणि मोबाईलचा वापर झोपण्याआधी टाळणे हे घटकही त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. झोपण्यापूर्वी त्वचेची नियमित आणि योग्य काळजी घेतली तर नैसर्गिक सौंदर्य टिकवणे सहज शक्य होते.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके