लाईफस्टाईल

त्वचा रोग, मुरुम, खाज यावर उपयोगी आहे डाळिंबाची साल

Rutuja Karpe

डाळिंबाचा समावेश हा सुपरफूड्सच्या यादीत होतो. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने त्वचेच्या समस्या दूर होतातच शिवाय शरीरातील लोहाची कमतरता देखील पूर्ण करू होते. डाळिंबामध्ये फायबर, झिंक, पोटॅशियम, लोह आणि ओमेगा ६ भरपूर प्रमाणात असते. एका डाळिंबात अनेक रोगांवरचे उपाय लपलेले असतात. असंख्य गुणांनी भरपूर या फळाच्या दाण्यांमध्ये जेवढा गोड पणा आहे तसेच याचे साल देखील उपयोगी असते. डाळिंबाच्या साल अनेक रोगांवर उपचारा करण्यासाठी उपयोगी ठरतात. यातील अँटीफंगल आणि अँटीवायरल गुणधर्मामुळे हे एक औषधाच्या रूपात काम करते. डाळिंबाचे साल अँटीऑक्सीडेंट ने समृद्ध  असते. डाळिंबाचे साल त्वचेचे आजार बरे करायला मदत करते तसेच खोकला, गळ्यातील खवखव याला आराम मिळतो. 

 डाळिंबाच्या सालीचे फायदे-  

१. डाळिंबाच्या सालांमध्ये अँटीबॅक्टीरियल, अँटीवायरल, अँटीइंफ्लेमेटरी गुण आढळतात. हे त्वचा रोग, मुरुम, खाज यावर उपयोगी आहे. डाळिंबाचे साल हे अनेक रोगांवर गुणकारी आहे. 

२. त्वचेवरच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंबाचे साल हे नैसर्गिक मॉइस्चराइजर आणि सनस्क्रीनच्या रूपात कार्य करते. 

३. डाळिंबाच्या सालात विटामिन सी जास्त प्रमाणात असते. जे आपल्या पूर्ण शारीरिक विकासासाठी एक महत्वपूर्ण तत्व आहे. 

४. डाळिंबाच्या सालात मोठया प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. जे एलडीएल कोलेस्ट्रॉला ऑक्सीडेशन पासून वाचवतो. हे पण सांगितले जाते की यातील पोषक्तत्वे हे हॄदयाच्या समस्या येण्यापासून रोखतात. 

५. डाळिंबाचे साल अँटीबेक्टेरिअल आणि अँटीफंगल गुणांनी समृद्ध असतात. जे तोंडातील हिरडयांच्या सुजेला, दाताचे तूटने आणि तोंडातील छाले यांवर उपयोगी आहे. 

६. डाळिंबाचे साल मानवी हाडांमधील घनत्वचे नुक़सान थांबतात.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त