लाईफस्टाईल

जेवण झाल्यावर तुम्हीही करतात या चुका? तज्ज्ञ सांगतात...

आपल्यापैकी बरेचजण जेवणानंतर लगेच अंघोळ करतात, 'कॅलरीज बर्न'च्या नादात धावायला जातात किंवा मोबाईल स्क्रोल करत डुलकी घेतात. हे सगळं रोजच्या घाईगडबडीत 'नॉर्मल' वाटतं, पण यामुळे शरीराचं नुकसान होतंय, हे कुणाच्या लक्षात येतं का? चला, जाणून घेऊया याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात.

Mayuri Gawade

आपल्यापैकी अनेकजण जेवण झाल्यानंतर लगेच अंघोळ करतात, तर काहीजण 'कॅलरीज बर्न'च्या नादात ट्रॅकवर धावायला निघतात, किंवा सोफ्यावर आडवं होऊन मोबाइल स्क्रोल करीत-करीत डुलकी घेतात. रोजच्या घाईगडबडीत हे सगळं अगदी 'नॉर्मल' वाटतं, पण यामुळे शरीराचं नुकसान होतंय, हे कुणाच्या लक्षात येतं का? चला तर मग, यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जाणून घेऊ तज्ज्ञांकडून ...

कोणत्या चुका टाळायच्या?

याच विषयावर आयुर्वेदाचार्य डॉ. मानसी मेहेंदळे धामणकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं आहे की, "जेवण झाल्यावर लगेच अंघोळ करणं, हेवी वर्कआउट करणं किंवा भरपूर चालणं या सगळ्या गोष्टी टाळायलाच हव्यात. विशेषतः जेवल्यानंतर लगेचच झोपणं, ही सुद्धा अतिशय चुकीची सवय आहे. याचे आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात."

कारण काय?

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण झाल्यावर शरीरातील रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे केंद्रित होतो. त्यावेळी जर हेवी वर्कआउट किंवा दीर्घ चालणं केलंत, तर रक्तप्रवाह स्नायूंकडे वळतो आणि पचनावर ताण येतो. तसेच लगेच जेवणानंतर अंघोळ केल्याने शरीरातील उष्णता व रक्तप्रवाहाचं संतुलन बदलतं, ज्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो.

त्या पुढे म्हणतात, "जेवणानंतर लगेच झोपणं ही देखील अत्यंत वाईट सवय आहे. असे केल्यास शरीरात ऍसिड रिफ्लक्सची तक्रार वाढू शकते. यामुळे छातीत जळजळ, ढेकर, अस्वस्थता अशा लक्षणांना निमंत्रण मिळतं."

यामुळे जेवणानंतर नॉर्मल वाटणाऱ्या या चुका टाळा.

(Disclaimer: ही माहिती डॉ. मानसी मेहेंदळे धामणकर यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवर आधारित आहे. यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video