PM
लाईफस्टाईल

मासांहारी पदार्थ खाल्ल्यानंतर पिकलेली पपई आवर्जुन खावी... पपई खाल्ल्याने 'हा' होतो फायदा

पपई ही जेवणझाल्यानंतर खाणे नेहमीच खूप फायदेशीर ठरते. कारण पपईमुळे जेवण पचण्यास खूप फायदा होते.

Swapnil S

पपई हे फळ मुळात दक्षिण मेक्सिकोमधील आहे. त्या नंतर त्याचा शोध भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, ब्राझील अशा अनेक देशांमध्ये झाला. पपई या फळामध्ये प्रथिने, खनिजे, 'अ', 'क' जीवनसत्व खूप जास्त प्रमाणात असतात. पपई जशी पिकते तसे तिच्यामधले 'क' जीवनसत्त्व अधिक वाढत जाते.

पपई ही जेवणझाल्यानंतर खाणे नेहमीच खूप फायदेशीर ठरते. कारण पपईमुळे जेवण पचण्यास खूप फायदा होते. त्यातून जर मांसाहार जेवण असेल तर जेवण झाल्यानंतर पपई आवर्जुन खाल्ली पाहिजे. मांसाहार जेवण पचायला जड जाते. मांसाहार जेवण पचण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो म्हणूनच मांसाहार पचण्यासाठी पिकलेली पपई नक्की खाल्ली पाहिजे . त्याचप्रमाणे पचनशक्ती वाढवण्यासाठी ही पपई मदत करते, जर भूक मंदवाली असेल तर कच्च्या पपईची भाजी खाल्यास पचनशक्ती अधिक वाढते. पपईमधील 'पॅपेन'मुळे अपचन,आम्लपित्त, बद्धकोष्ठता हे पोटाचे विकार कायमचे दूर होतात. त्यातून पिकलेल्या पपईमध्ये फळशर्करा असते जी रक्तामध्ये लगेच शोषली गेल्याने ऊर्जा आणि उत्साहती वाढतो.

केवळ पोटाच्या तक्रारीसाठीच नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठी देखील पपईचा वापर केला जातो. पपईच्या मदतीने आपण त्वचेवर ग्लो आणू शकतो. कारण ते आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते. हे व्हिटॅमिन ए आणि पॅपेन एंझाइमचा समृद्ध स्रोत आहे, त्यामुळे त्वचेच्या मृत पेशी आणि निष्क्रिय प्रथिने काढून टाकण्यास मदत होते, ज्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता