लाईफस्टाईल

Oil For Hair: केसांची लांबी वाढवायची आहे? आवर्जून 'हे' तेल वापरा, जाणून घ्या लावण्याची योग्य पद्धत

Tejashree Gaikwad

Rosemary Oil For Hair: प्रत्येकाच्या सौंदर्यात भर घालते ते त्यांचे केस. लांब आणि दाट केस सगळ्यांच हवेहवेसे वाटतात. चांगल्या केसांसाठी लोक अनेक उपाय करतात. केसांची वाढ तुमच्या आहारावर आणि तुम्ही त्यांची कशी काळजी घेतात त्यावर अवलंबून असते. जर तुम्हाला तुमचे केस लांब आणि दाट हवे असतील तर केसांना तेल लावा. याचा केसांच्या वाढीवर चांगला परिणाम होईल. परंतु केसांना सामान्य तेलाऐवजी रोझमेरी तेल वापरू शकता. याने तुमचे केस काही दिवसात सुंदर आणि लांब होतील. मात्र, तुम्हाला हे तेल नक्की कसे वापरायचे हे समजले पाहिजे. चला हे तेल कसे लावायचे आणि त्याचे काय काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात.

कसं लावायचं रोझमेरी तेल?

केसांवर रोझमेरी तेल लावण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तुमच्या नेहमीच्या तेलात खोबरेल तेलात काही थेंब रोझमेरी तेल घालून वापरणे. केसांना तेल लावताना हे तेल ५-६ थेंब घेऊन छान मसाज करा.

काय फायदे मिळतील?

  • रोझमेरी तेल टाळूवर लावल्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केस गळती थांबते.

  • हे तेल केस लांब करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. छान मसाज केल्याने केसांच्या लांबीमध्ये फरक दिसून येतो.

  • पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असलेले लोकही रोझमेरी तेलाचा वापर करू शकतात.

  • तुमच्या केसात कोंडा असेल तर आवर्जून रोझमेरी तेल वापरा.

  • रोझमेरी तेलामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म टाळूची जळजळ कमी करतात.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत