लाईफस्टाईल

सेकंड हँड कार घ्यायचीये? या ३ चुका करू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान!

आजच्या काळात स्वतःची कार असणं ही केवळ लक्झरी राहिलेली नाही, तर गरज बनली आहे. सेकंड हँड कार खरेदी करताना लोक तीन महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. सर्विस हिस्ट्री...

Mayuri Gawade

आजच्या काळात स्वतःची कार असणं ही केवळ लक्झरी राहिलेली नाही, तर गरज बनली आहे. मात्र, नव्या कारच्या वाढत्या किमतींमुळे अनेकजण सेकंड हँड कार घेणं पसंत करतात. हा पर्याय नक्कीच परवडणारा असला तरी थोडीशी घाईगडबड मोठं आर्थिक नुकसान करू शकते.

सेकंड हँड कार खरेदी करताना लोक तीन महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. सर्विस हिस्ट्री व कागदपत्रं तपासणं, टेस्ट ड्राईव्ह घेणं आणि मेकॅनिककडून तपासणी करून घेणं. या गोष्टी लहान वाटल्या तरी भविष्यात गाडीवर किती खर्च करावा लागेल हे यावरच ठरतं.

सर्विस हिस्ट्री आणि डॉक्युमेंट्स तपासा

गाडीची सर्विस हिस्ट्री म्हणजे तिचं आरोग्यपत्रकच आहे. गाडी किती वेळा सर्व्हिस झाली, कोणते पार्ट्स बदलले गेले, गाडीचा कधी अक्सिडेंट तर झाला नव्हता ना? हे सगळं नीट बघणं गरजेचं आहे. त्यासोबतच आरसी, इन्शुरन्स, पोल्युशन सर्टिफिकेट आणि लोन क्लीयरन्स पेपर्स पडताळून घ्या. चुकीची किंवा बनावट कागदपत्रं वापरून गाड्या विकल्या जाण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे ही तपासणी अत्यावश्यक आहे.

टेस्ट ड्राईव्ह घेणं विसरू नका

फक्त गाडी पाहून आकर्षित होऊ नका. टेस्ट ड्राईव्ह घेतल्यावरच इंजिन किती दमदार आहे, ब्रेक किती मजबूत आहेत, गिअर बदलताना त्रास होतो का आणि सस्पेन्शन नीट आहे का याचा खरा अंदाज येतो. बाहेरून चमकदार दिसणारी गाडी चालवताना अनेक समस्या उद्भवू शकतात.

मेकॅनिककडून तपासणी करून घ्या

गाडी खरेदी करण्यापूर्वी एखाद्या अनुभवी मेकॅनिककडून ती नीट तपासून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इंजिन, टायर, बॅटरी, अंडरबॉडी याबद्दल तो योग्य माहिती देऊ शकतो. यामुळे पुढे मोठ्या रिपेअरिंगचा खर्च टाळता येतो.

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार