लाईफस्टाईल

Shiv Jayanti 2026 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा

शौर्य, धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याची शिकवण देणाऱ्या शिवरायांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

किशोरी घायवट-उबाळे

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस. शौर्य, धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याची शिकवण देणाऱ्या शिवरायांची जयंती १९ फेब्रुवारीला दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

शिव जयंती २०२६ निमित्त तुम्हीही आपल्या मित्र-परिवाराला, नातेवाईकांना आणि सहकाऱ्यांना खास मराठी शुभेच्छा पाठवू शकता. WhatsApp स्टेटस, Facebook पोस्ट, Instagram कॅप्शन किंवा मेसेजद्वारे हे प्रेरणादायी संदेश शेअर करून शिवरायांप्रती आदर व्यक्त करा आणि या ऐतिहासिक दिवसाचा आनंद दुप्पट करा.

तुमच्यासाठी खास शुभेच्छा संदेश :

  1. जय भवानी, जय शिवाजी! स्वराज्याचा अभिमान

    प्रत्येकाच्या हृदयात सदैव जागा राहो.

  2. धर्मरक्षण आणि स्त्री सन्मानाची शिकवण देणाऱ्या

    शिवरायांना कोटी कोटी प्रणाम.

  3. शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन नव्या ध्येयाने पुढे जाऊया.

    शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!

  4. शिवरायांचे कर्तृत्व आपल्याला संकटातही धैर्याने

    उभे राहण्याची ताकद देवो. जय शिवराय!

  5. शिवरायांचा इतिहास म्हणजे प्रेरणेचा अखंड झरा,

    तो आपल्या आयुष्यात नवी ऊर्जा निर्माण करो.

  6. शिवजयंती निमित्त आपल्या जीवनात शौर्य, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास नांदो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी हार्दिक शुभेच्छा!

  7. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा वारसा जपूया,

    सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

  8. स्वराज्याची ज्योत सदैव तेवत ठेवूया आणि

    शिवरायांच्या विचारांनी जीवन उजळवूया. जय शिवाजी!

  9. शौर्य, धैर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक

    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

    शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

  10. शिवरायांचा विचार, स्वाभिमानाची तलवार
    आपल्या आयुष्यात नेहमीच राहो साकार! जयंतीच्या शुभेच्छा!

Railway Travel Insurance : काउंटरवरील तिकिटावरही ४५ पैशांत १० लाखांपर्यंतचा विमा; २७ ऑक्टोबरपासून रेल्वेचा नवा नियम

UPI Payment Failed : खात्यातून पैसे कट झाले, पण पेमेंट फेल? बँकेकडून मिळू शकते रोज १०० रुपयांची नुकसानभरपाई; जाणून घ्या नियम

Thane : भाजप-शिंदे सेनेत 'टोळीयुद्ध'; सत्तेच्या मलिद्यासाठी भांडणाचे नाटक, हर्षवर्धन सपकाळ यांची निष्पक्ष चौकशीची मागणी

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

डॉक्टरांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ! सिंधुदुर्गात कामबंद आंदोलन; दोन महिन्यांपासून वेतन थकीत, आंदोलनाचा इशारा