Shivrajyabhishek Sohala at Raigad Fort : मराठा साम्राज्याचे महान शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वपूर्ण आहे. शेकडो वर्षांपूर्वी, ६ जून १६७४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज मुघलांचा पराभव करून परत आले आणि त्यांचा मराठा शासक म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. या दिवशी सुमारे ५ हजार फूट उंचीवर असलेल्या रायगड किल्ल्यात मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. यानंतर त्यांनी स्वतःला एक शक्तिशाली हिंदू सम्राट म्हणून स्थापित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. महाराष्ट्रात हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो, तर संपूर्ण देशात तो हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. या खास दिनानिमीत्त तुम्ही प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता किंवा सोशल मीडियावर या खास दिनाचे मराठमोळे शुभेच्छा स्टेटस (Shivrajyabhishek Din 2024 Wishes, Status, Images, Quotes, Messages & Greetings) ठेवू शकता.
बघा हे शुभेच्छा कोट्स
> ''प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा''
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!!
> शिवराज्याभिषेक दिनी
छत्रपती शिवाजी महाराजांना
मानाचा मुजरा!
> निश्चयाचा महामेरू।
बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू।
श्रीमंत योगी।।
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!!
> सोहळा हा स्वराज्याचा,
महाराष्ट्राचा अस्मितेचा
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
> स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
> अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा
त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा
डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)