श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी खास! डबल लेअर बेसन-खवा लाडूंची सोपी रेसिपी, आताच नोट करा 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी खास! डबल लेअर बेसन-खवा लाडूंची सोपी रेसिपी, आताच नोट करा

श्रावणी सोमवार, नागपंचमी आणि श्रावणातील इतर सणांसाठी घरच्या घरी बनवा डबल लेअर खवा-बेसन लाडू. मऊसर खव्याचं स्टफिंग आणि खमंग बेसनाची सोपी रेसिपी जाणून घ्या.

Mayuri Gawade

श्रावण महिना म्हणजे पूजा, व्रत-वैकल्यं, सण आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल. श्रावणी सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला नैवेद्यासाठी काहीतरी खास बनवायचं असेल, तर डबल लेअर खवा-बेसन लाडू हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

पारंपरिक बेसन लाडूंना यावेळी एक खास ट्विस्ट द्या. बाहेरून साजूक तुपात भाजलेल्या बेसनाचा खमंग स्वाद आणि आतमध्ये मऊसर खव्याचं रिच स्टफिंग असलेले हे लाडू दिसायलाही आकर्षक आणि चवीला अगदी मिठाईच्या दुकानातील लाडूंप्रमाणे लागतात. कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी सणाच्या ताटाची शोभा नक्कीच वाढवेल.

साहित्य :

  • साजूक तूप - १ कप

  • बेसन - २ कप

  • खवा (मावा) - १ कप

  • पिठीसाखर - १ कप

  • वेलची पूड - १/२ टीस्पून

  • केशर - ७ ते ८ काड्या

  • पिस्त्याची पूड किंवा बारीक तुकडे - २ टेबलस्पून

कृती :

  • कढईत साजूक तूप गरम करून त्यात बेसन घाला आणि मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.

  • दुसऱ्या भांड्यात खवा घेऊन त्यात वेलची पूड, केशर आणि पिस्त्याची पूड मिसळा. हे मिश्रण मऊसर मळून त्याचे लहान गोळे तयार करून ठेवा.

  • भाजलेलं बेसन थोडं कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर आणि थोडी वेलची पूड घालून नीट एकजीव करा.

  • आता हातावर बेसनाचं मिश्रण घेऊन त्याच्या मध्यभागी खव्याचा गोळा ठेवा.

  • चारही बाजूंनी बेसनाचं मिश्रण लावून गोल आकार देत डबल लेअर लाडू तयार करा.

  • सर्व लाडू तयार झाल्यानंतर वरून पिस्त्याचे तुकडे किंवा केशर घालून सजवा.

श्रावणातील सणांसाठी हे रिच, मऊसर आणि खमंग डबल लेअर खवा-बेसन लाडू नैवेद्यासाठी तसेच पाहुणचारासाठीही उत्तम पर्याय ठरतील.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग