आपल्या शरीराला विविध Vitamin ची गरज असते. यामध्ये काही प्रमुख Vitamin आहेत ज्याच्या कमतरतेमुळे अनेक आजार संभवतात. त्यापैकीच आहे Vitamin D. शरीरात Vitamin D च्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे त्रास होतात. यामध्ये सर्वात प्रथम तुमच्या हाडांवर थेट परिणाम होतो. गुडघे दुखी, कंबर दुखी, पाय दुखणे अशा अनेक, वारंवार थकवा येणे, अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागते. तुमच्या शरीरात Vitamin D ची कमतरता आहे हे कसे ओळखाल? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय.
Vitamin D च्या कमतरतेची ही आहेत १० लक्षणे
थकवा येणे
सामान्यपणे तुम्हाला जेव्हा इतरांपेक्षा जास्त थकवा जाणवतो किंवा थोडेच काम केले तरी लगेच थकवा जाणवत असेल तर समजून घ्या हे शरीरातील Vitamin D च्या कमतरतेचे संकेत आहेत.
हाडांचे दुखणे
तुम्हाला जर सातत्याने कंबर, गुडघे, आणि सांध्यांमध्ये दुखत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका Vitamin D च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत झाल्याने, अशा प्रकारचे दुखणे संभवते.
केस गळणे
तुम्हाला वाटेल केस गळण्याचा आणि Vitamin D चा काय संबंध आहे. मात्र, Vitamin D हे केसांसाठी देखील पोषण देणारे तत्व आहे. परिणामी याच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमचे खूप जास्त केस गळत असेल तर Vitamin D ची कमतरता असू शकते.
सारखे-सारखे आजारी पडमे
Vitamin D ची शरीरात कमतरता असल्यास व्यक्तीची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी शरीर कमकुवत होते. त्यामुळे सर्दी-खासी सारखे आजार सातत्याने होऊ शकतात.
मूड स्विंग होणे
मूड स्विंग होण्याच्या समस्येला नियंत्रणात ठेवणारे हार्मोन Vitamin D मुळे तयार होतात. त्यामुळे Vitamin D च्या कमतरते मुळे तुम्हाला चिडचिड होणे, ताणतणावासारखे आजार वाढू शकतात आणि वांरवार मूड स्विंग होण्याची समस्या उद्भवू शकते.
चांगली झोप न येणे
तुम्हाला झोप येते मात्र ती व्यवस्थित होत नाही. काही ना काही कारणामुळे तुमची झोप मोड होत असेल तर Vitamin D च्या कमतरतेचे हे एक लक्षण असू शकते.
स्नायू कमकुवत होणे
तुमचे हाता पायांचे स्नायू सातत्याने दुखत असतील तर Vitamin D च्या कमतरतेमुळे असे होऊ शकते.
त्वचा रूक्ष होणे
तुमची त्वचा सातत्याने रूक्ष होत आहे का? Vitamin D हे त्वचेला देखील पोषण देते. मात्र, तुमची त्वचा सातत्याने रूक्ष होत असेल तर तुम्हाला Vitamin D च्या आपूर्तीकडे लक्ष द्यावे लागेल.
वजन वाढणे
Vitamin D च्या कमतरतेमुळे मेटाबॉलिजम स्लो होते. त्यामुळे अचानक वजन वाढायला लागते. तुम्हाला वजन वाढीची समस्या होत असेल तर Vitamin D च्या कमतरतेचे ते एक लक्षण असू शकते.
'या' आहारातून मिळेल Vitamin D
Vitamin D हे दूध, दही, पनीर, मासे, अंड्यातील पिवळा बलक, मशरूम, ऑरेंज ज्यूस आणि सोया मिल्क इत्यादींमधून भेटू शकते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)