स्किनकेअर प्रॉडक्ट्स लावताना 'या' चुका करू नका; तज्ज्ञांनी सांगितले योग्य कॉम्बिनेशन 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

स्किनकेअर प्रॉडक्ट्स लावताना 'या' चुका करू नका; तज्ज्ञांनी सांगितले योग्य कॉम्बिनेशन

स्किनकेअर प्रॉडक्ट्स लावताना नेहमी पातळ टेक्सचरपासून जाड टेक्सचरकडे जाण्याचा नियम पाळावा.

किशोरी घायवट-उबाळे

आजकाल स्किनकेअरमध्ये रेटिनॉल, व्हिटॅमिन C, नायसिनामाइड, हायलुरॉनिक ॲसिड आणि पेप्टाइड्स यांसारख्या ॲक्टिव्ह इन्ग्रेडिएंट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, हे सर्व घटक एकत्र वापरणे नेहमीच फायदेशीर ठरत नाही. काही इन्ग्रेडिएंट्स एकमेकांचा प्रभाव वाढवतात, तर काही त्वचेवर दुष्परिणाम करू शकतात. त्यामुळे स्किनकेअर प्रॉडक्ट्स योग्य क्रमाने आणि योग्य पद्धतीने वापरणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

इन्ग्रेडिएंट कॉकटेलिंग म्हणजे काय?

एकापेक्षा जास्त स्किनकेअर इन्ग्रेडिएंट्स योग्य पद्धतीने एकत्र वापरण्याला इन्ग्रेडिएंट कॉकटेलिंग म्हणतात. यामध्ये असे घटक निवडले जातात जे एकमेकांच्या परिणामकारकतेत वाढ करतात किंवा त्वचेवरील त्रास कमी करण्यास मदत करतात.

तज्ज्ञांच्या मते, जास्तीत जास्त ॲक्टिव्ह इन्ग्रेडिएंट्स एकाच वेळी वापरण्यापेक्षा त्वचेच्या गरजेनुसार फक्त एक किंवा दोन प्रभावी घटक निवडणे अधिक फायदेशीर ठरते.

नवशिक्यांनी कोणती काळजी घ्यावी?

स्किनकेअरमध्ये नवीन असाल तर एकावेळी अनेक ॲक्टिव्ह इन्ग्रेडिएंट्स वापरू नका.

  • एक नवीन इन्ग्रेडिएंट वापरल्यानंतर किमान दोन ते तीन आठवडे त्याचा परिणाम पाहा.

  • त्यानंतरच दुसरा ॲक्टिव्ह इन्ग्रेडिएंट वापरण्यास सुरुवात करा.

  • सुरुवातीला कमी प्रमाण आणि कमी वारंवारतेने वापर करावा.

  • मॉइश्चरायझर, सेरामाइड्स आणि सनस्क्रीनला नेहमी प्राधान्य द्यावे.

स्किनकेअर लेयरिंगची योग्य पद्धत

स्किनकेअर प्रॉडक्ट्स लावताना नेहमी पातळ टेक्सचरपासून जाड टेक्सचरकडे जाण्याचा नियम पाळावा.

क्रम असा असावा:

  • क्लिंझर

  • टोनर किंवा एसेन्स

  • व्हिटॅमिन C किंवा AHA/BHA सारखे वॉटर-बेस्ड ॲक्टिव्ह

  • हायलुरॉनिक ॲसिड, नायसिनामाइड किंवा पेप्टाइड्स

  • रेटिनॉल किंवा इतर ट्रीटमेंट क्रीम

  • मॉइश्चरायझर किंवा फेस ऑईल

  • सकाळी शेवटी सनस्क्रीन

त्वचेनुसार स्किनकेअर निवडा

तेलकट आणि मुरुमांची त्वचा

  • नायसिनामाइड

  • सॅलिसिलिक ॲसिड

  • झिंक

कोरडी किंवा संवेदनशील त्वचा

  • सेरामाइड्स

  • फॅटी ॲसिड्स

  • कोलेस्टेरॉलयुक्त मॉइश्चरायझर

वयानुसार काळजी

२० ते ३० वर्षे

  • सनस्क्रीन

  • अँटिऑक्सिडंट्स

  • व्हिटॅमिन C

४० वर्षांनंतर

  • रेटिनॉल

  • पेप्टाइड्स

  • सेरामाइड्स

  • बॅरिअर रिपेअर प्रॉडक्ट्स

त्वचेसाठी फायदेशीर इन्ग्रेडिएंट कॉम्बिनेशन

  • रेटिनॉल + पेप्टाइड्स - सुरकुत्या कमी करण्यासाठी

  • व्हिटॅमिन C + फेरुलिक ॲसिड - त्वचेचा उजळपणा वाढवण्यासाठी

  • नायसिनामाइड + हायलुरॉनिक ॲसिड - त्वचेला हायड्रेशन आणि बॅरिअर संरक्षण

  • सॅलिसिलिक ॲसिड + नायसिनामाइड - मुरुम आणि तेलकट त्वचेसाठी

  • सेरामाइड्स + फॅटी ॲसिड्स + कोलेस्टेरॉल - त्वचेचे संरक्षण मजबूत करण्यासाठी

  • नायसिनामाइड + झिंक - अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी

'हे' कॉम्बिनेशन टाळा

  • रेटिनॉल + AHA/BHA - यामुळे त्वचा सोलणे, लालसरपणा आणि जळजळ होऊ शकते.

पर्याय: ॲसिड सकाळी आणि रेटिनॉल रात्री किंवा वेगवेगळ्या दिवशी वापरा.

  • व्हिटॅमिन C + रेटिनॉल - हे दोन्ही एकाच वेळी वापरल्यास त्वचेची जळजळ वाढू शकते आणि दोन्हींचा प्रभाव कमी होऊ शकतो.

पर्याय: सकाळी व्हिटॅमिन C आणि रात्री रेटिनॉल वापरा.

  • रेटिनॉल + बेंझॉईल पेरॉक्साइड - हे कॉम्बिनेशन रेटिनॉलची परिणामकारकता कमी करू शकते.

पर्याय: सकाळी बेंझॉईल पेरॉक्साइड आणि रात्री रेटिनॉल वापरा.

तज्ज्ञांचा सल्ला

त्वचेसाठी एकाच वेळी अनेक ॲक्टिव्ह इन्ग्रेडिएंट्स वापरण्यापेक्षा योग्य कॉम्बिनेशन निवडणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या त्वचेचा प्रकार, वय आणि हवामान लक्षात घेऊन स्किनकेअर रूटीन तयार केल्यास त्वचेला अधिक फायदा होतो. कोणताही नवीन ॲक्टिव्ह इन्ग्रेडिएंट वापरण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणेही तितकेच आवश्यक आहे.

(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

आजचे राशिभविष्य, ३ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

घशात खवखव आणि गिळताना त्रास होतोय? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

वॉशिंग मशीनमध्ये ॲल्युमिनिअम फॉईलचा गोळा टाकतात... पण का? जाणून घ्या भन्नाट फायदे

नूडल्स खाऊनही होईल वजन कमी! ट्राय करा लो-कॅलरी वेट लॉस नूडल्सची सोपी रेसिपी

फुफ्फुसांचा कर्करोग टाळण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' महत्त्वाचे बदल