(Photo-Yandex)
लाईफस्टाईल

Skincare Tips : सकाळी की रात्री? Retinol ते Vitamin C वापरण्याची योग्य वेळ कोणती? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांच्या मते, रेटिनॉल (Retinol) हे प्रामुख्याने रात्री वापरावे. कारण ते फोटोसेन्सिटिव्ह (Photosensitive) असते आणि सूर्यप्रकाशामुळे त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. तसेच...

किशोरी घायवट-उबाळे

त्वचेची योग्य काळजी घेणे हे सेल्फ केअरचा महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र बाजारात उपलब्ध असलेली विविध उत्पादने आणि वेगवेगळ्या सल्ल्यांमुळे नेमके सकाळी कोणते प्रोडक्ट आणि रात्री कोणते प्रोडक्ट वापरावे, याबाबत अनेकजण गोंधळलेले असतात. त्वचारोगतज्ज्ञ गुरवीन वाराइच यांनी हा गोंधळ दूर करत एक सोपा स्किनकेअर गाईड सांगितला आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्किनकेअर रुटीन सुरू करण्यापूर्वी कोणते घटक सकाळी आणि कोणते रात्री वापरावेत, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

तज्ज्ञांच्या मते, रेटिनॉल (Retinol) हे प्रामुख्याने रात्री वापरावे. कारण ते फोटोसेन्सिटिव्ह (Photosensitive) असते आणि सूर्यप्रकाशामुळे त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. तसेच रेटिनॉल वापरल्यानंतर त्वचा सूर्यप्रकाशासाठी अधिक संवेदनशील होते, त्यामुळे जळजळ किंवा सनबर्न (Sunburn) चा धोका वाढतो. दुसरीकडे, हायल्युरॉनिक ॲसिड (Hyaluronic Acid) हे दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस सुरक्षितपणे वापरता येते. हे त्वचेला खोलवर हायड्रेट करून त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.

ग्लायकॉलिक ॲसिड (Glycolic Acid) हे त्वचेवरील एक्सफोलिएशन म्हणजेच त्वचेवरील मृत पेशी काढण्याचे काम करते, त्यामुळे ते प्रामुख्याने रात्री वापरण्याचा सल्ला दिला जातो. सॅलिसिलिक ॲसिड (Salicylic Acid) देखील दिवसा आणि रात्री वापरता येते, परंतु त्यानंतर सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक आहे. नायसिनामाइड (Niacinamide) हा एक स्थिर घटक असून तो त्वचेची दुरुस्ती (repair), त्वचेवरील तेल नियंत्रण आणि त्वचेची चमक वाढवण्यास मदत करतो. तोही दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस वापरता येतो.

व्हिटॅमिन C (Vitamin C) हा एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असून तो सकाळी वापरणे अधिक फायदेशीर मानले जाते. तो त्वचेला सूर्यप्रकाशापासून संरक्षण देतो आणि सनस्क्रीनचा प्रभाव वाढवतो.

योग्य वेळी योग्य स्किनकेअर उत्पादने वापरल्यास त्वचा निरोगी, चमकदार आणि तरुण दिसण्यास मदत होते. यासाठी नियमितता आणि योग्य पद्धतीने स्किनकेअर रुटीन पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

सेनेची लोकशाही रचना उद्धव यांनी बदलली; शिंदे गटाच्या वकिलांचा आरोप, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मराठा समाज आक्रमक, अनेक जिल्ह्यांत आंदोलन

एसटी आता 'विना वाहक'; महामंडळाची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी मनुष्यबळ खर्चात कपात

गणेश गल्लीत अवतरणार 'संतभूमी'! संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे जिवंत दर्शन देखाव्यांतून घडविणार

अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेमधील अतिक्रमणे हटवली; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा