Canva 
लाईफस्टाईल

झोप पूर्ण होऊनही चिडचिडेपणा वाटतोय? 'हा' आहे रामबाण उपाय

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये कुणाला कामाचा ताण आहे, तर कुणाला अभ्यासाचा. यामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसतो. अनेकवेळा नीट झोप घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर डोकं जड वाटणं, चिडचिडेपणा जाणवणं अशी लक्षणं दिसतात. मेंदूला पुरेसा आराम मिळत नसल्याची ही लक्षणं आहेत. या समस्येवर सोपा उपाय म्हणजे 'स्लीप मेडिटेशन'.

नेहा जाधव - तांबे

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये कुणाला कामाचा ताण आहे, तर कुणाला अभ्यासाचा. यामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसतो. अनेकवेळा नीट झोप घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर डोकं जड वाटणं, चिडचिडेपणा जाणवणं अशी लक्षणं दिसतात. मेंदूला पुरेसा आराम मिळत नसल्याची ही लक्षणं आहेत.

या समस्येवर सोपा उपाय म्हणजे 'स्लीप मेडिटेशन'. झोपण्याआधी नियमितपणे स्लीप मेडिटेशन केल्याने मानसिक थकवा कमी होतो आणि चिडचिडेपणावर नियंत्रण मिळवता येतं.

चिडचिडेपणा का होतो?

  • सततचा ताण

  • एका गोष्टीबद्दल वारंवार विचार करणं

  • हार्मोनल बदल

  • शारीरिक आणि मानसिक थकवा

स्लीप मेडिटेशनचे फायदे

मानसिक ताण कमी - वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करून स्लीप मेडिटेशन चिंता व तणाव कमी करतं, त्यामुळे मन शांत राहतं.

गाढ झोपेस मदत - ही ध्यानपद्धती शरीर व मन शिथील करत असल्यामुळे झोप चांगली लागते, आणि सकाळी फ्रेश वाटतं.

सकारात्मक हार्मोन्सचं स्रवण - डोपामीन, सेरोटोनिन, मेलाटोनिन यांसारख्या मूड सुधारणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं.

स्वत्वाची जाणीव - मेडिटेशनमुळे स्वतःच्या भावना आणि विचार ओळखायला मदत होते, जे चिडचिड रोखण्यासाठी उपयुक्त आहे.

अती विचारांवर नियंत्रण - मन शांत असल्यामुळे विचारपूर्वक प्रतिक्रिया देता येतात. सतत एखाद्या गोष्टीचा विचार येत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवता येतं. यामुळे चिडचिडेपणा कमी होतो.

स्लीप मेडिटेशन कसं करावं?

  • झोपण्याआधी हात-पाय धुवा.

  • खोलीचा प्रकाश मंद करा. मोबाईल-टीव्ही बंद करा.

  • पाठीवर झोपा आणि शरीर सैल करा.

  • डोळे बंद करून हळूहळू श्वास घ्या.

  • ही प्रक्रिया ५-१० वेळा करा.

  • सर्व लक्ष स्वतःच्या शरीरावर केंद्रित करा.

  • विचार येऊ द्या, पण त्यावर प्रतिक्रिया देऊ नका.

दररोज रात्री झोपेपूर्वी स्लीप मेडिटेशन केल्याने काही दिवसांत चिडचिडेपणात बदल जाणवेल. व्यवस्थित झोप असूनही जर तुमचं मन शांत राहत नसेल, तर स्लीप मेडिटेशन हे एक प्रभावी साधन आहे. यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारतं. त्यामुळे तुम्ही अधिक शांत आणि सकारात्मक वाटू लागता.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल