(Photo-@sanjeevkapoor)
लाईफस्टाईल

तिखटप्रेमींसाठी खास! झणझणीत सावजी पनीर मसाला; घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल डिश

सावजी मसाल्याचा ठसका आणि पनीरची चव यांचा अप्रतिम संगम म्हणजे 'सावजी पनीर मसाला'. घरी खास पाहुणे आले असतील किंवा विकेंडला काहीतरी हटके बनवायचे असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

किशोरी घायवट-उबाळे

झणझणीत आणि मसालेदार चवीसाठी ओळखली जाणारी सावजी पद्धत आता फक्त नॉनव्हेजपुरती मर्यादित नाही. सावजी मसाल्याचा ठसका आणि पनीरची चव यांचा अप्रतिम संगम म्हणजे 'सावजी पनीर मसाला'. घरी खास पाहुणे आले असतील किंवा विकेंडला काहीतरी हटके बनवायचे असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

साहित्य :

पनीरसाठी -

  • पनीर (२ इंच तुकडे) - ४०० ग्रॅम

  • लाल तिखट - १ टीस्पून

  • धणेपूड - १ टीस्पून

  • हळद - अर्धा टीस्पून

  • आलं-लसूण पेस्ट - २ टेबलस्पून

  • लिंबाचा रस - १ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • काळा मसाला - १ टेबलस्पून

  • तेल - २ ते ३ टेबलस्पून

ग्रेव्हीसाठी -

  • सावजी मसाला पेस्ट - १ कप

  • तेल - २ ते ३ टेबलस्पून

  • कांद्याची पेस्ट - दीड कप

  • आलं-लसूण पेस्ट - दीड टेबलस्पून

  • टोमॅटो प्युरी - १ कप

  • जिरेपूड - १ टीस्पून

  • धणेपूड - १ टीस्पून

  • लाल तिखट - १ टीस्पून

  • हळद - अर्धा टीस्पून

  • काळा मसाला - १ टेबलस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • लिंबाचा रस - १ टीस्पून

  • कोथिंबीर - २ टेबलस्पून

  • हिरव्या मिरच्या (चिरलेल्या) - २ ते ३

कृती :

सर्वप्रथम पनीरच्या तुकड्यांना लाल तिखट, धणेपूड, हळद, आलं-लसूण पेस्ट, लिंबूरस, मीठ आणि काळा मसाला लावून १५ ते २० मिनिटे मुरवून ठेवा. नंतर कढईत तेल गरम करून पनीरचे तुकडे दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्या.

ग्रेव्हीसाठी कढईत तेल गरम करून कांद्याची पेस्ट सोनेरी होईपर्यंत परता. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून २ ते ३ मिनिटे परता. नंतर टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत शिजवा. त्यात सावजी मसाला पेस्ट आणि सर्व सुके मसाले घालून चांगले परता. थोडे पाणी घालून २ ते ३ मिनिटे उकळी आणा. शेवटी लिंबूरस घालून फ्राय केलेले पनीर, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घालून हलक्या हाताने मिसळा. एक मिनिट शिजवून गरमागरम सर्व्ह करा. ही डिश गरम पराठे, भाकरी किंवा तंदुरी रोटीबरोबर अप्रतिम लागते.

टिप्स :

  • सावजी मसाला जास्त तिखट असतो, त्यामुळे तिखटाचे प्रमाण सांभाळून वापरा.

  • पनीर जास्त वेळ फ्राय करू नका, नाहीतर ते कडक होऊ शकते.

  • ग्रेव्ही अधिक जाड आणि टेस्टी हवी असल्यास थोडी काजू पेस्ट घालू शकता.

  • मसाल्याचा खमंग स्वाद यावा यासाठी कांदा व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत परतणे महत्त्वाचे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती