अचानक पाहुणे आले तरी चिंता नको! बनवा रेस्टॉरंटसारखी चमचमीत व्हेज कोल्हापुरी; लगेचच नोट करून घ्या सोपी रेसिपी 
लाईफस्टाईल

अचानक पाहुणे आले तरी चिंता नको! बनवा रेस्टॉरंटसारखी चमचमीत व्हेज कोल्हापुरी; लगेचच नोट करून घ्या सोपी रेसिपी

कधी कधी अचानक घरी पाहुणे येतात आणि जेवण पटकन तयार करायचं असतं. अशा प्रसंगी मसालेदार आणि चमचमीत व्हेज कोल्हापुरी ही डिश तुमच्यासाठी रेस्क्यू प्रमाणे ठरते.

Mayuri Gawade

कधी कधी अचानक घरी पाहुणे येतात आणि जेवण पटकन तयार करायचं असतं. अशा प्रसंगी मसालेदार आणि चमचमीत व्हेज कोल्हापुरी ही डिश तुमच्यासाठी रेस्क्यू प्रमाणे ठरते. घरच्या साध्या साहित्यापासून तयार होणारी ही डिश, तिखटपणा आणि सुगंधाच्या संगमामुळे जेवणाला लगेचच खास रंग देते.

साहित्य

भाज्यांसाठी:

  • गाजर - १ (चिरलेलं)

  • बटाटा - १ (क्युबमध्ये कापलेला)

  • फुलकोबी - १ कप (तुकडे केलेले)

  • शेंगा - ७ ते ८ (कापलेल्या)

  • मटार - अर्धा कप

  • कांदा - १ मोठा (चिरलेला)

  • टोमॅटो - २ मध्यम (चिरलेले)

  • आले-लसूण पेस्ट - १ टीस्पून

  • तेल - ३ टेबलस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • कोथिंबीर - सजावटीसाठी

कोल्हापुरी मसाला तयार करण्यासाठी:

  • सुके खोबरे (किसलेले) - २ टेबलस्पून

  • खसखस - १ टीस्पून

  • काजू - ५ ते ६

  • धने - १ टेबलस्पून

  • जिरे - १ टीस्पून

  • बडीशेप - १ टीस्पून

  • लवंगा - २

  • दालचिनी - १ छोटा तुकडा

  • काळी मिरी - ५ ते ६ दाणे

  • सुके लाल मिरचे - ४ ते ५

  • हळद - अर्धा टीस्पून

कृती

  1. सर्व भाज्या स्वच्छ धुवून थोडं मीठ व पाण्यात अर्धवट शिजवा.

  2. एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात धने, जिरे, बडीशेप, लवंग, दालचिनी, काळी मिरी, लाल मिरच्या, खोबरे आणि खसखस घालून मंद आचेवर भाजा.

  3. भाजलेले मसाले थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काजू आणि थोडं पाणी घालून बारीक वाटा. हाच आपला कोल्हापुरी मसाला.

  4. खोल कढईत तेल गरम करून आले-लसूण पेस्ट आणि चिरलेला कांदा परतवा. कांदा हलका सोनेरी झाला की टोमॅटो घालून नरम होईपर्यंत शिजवा.

  5. तयार मसाला घालून ५ मिनिटे मंद आचेवर परतवा. नंतर थोडं पाणी घालून घट्ट ग्रेवी तयार करा.

  6. उकडलेल्या भाज्या ग्रेवीत घालून मीठ टाका आणि ७-८ मिनिटे शिजवा. वरून कोथिंबीर टाका.

  7. गरमागरम व्हेज कोल्हापुरी बटर नान, तंदुरी रोटी किंवा जिरा राईससोबत सर्व्ह करा.

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याचे बनावट पत्र व्हायरल; PIB चा खुलासा

Mumbai : अटल सेतूवर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवण्याचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल होताच रायडरविरोधात FIR दाखल

तोरणमाळच्या झिपलाईनवर जीव टांगणीला! ३,५०० फूट दरीवर अडकला पर्यटक; थरार पाहून धडकी भरेल, बघा Video