Photo-Yandex
लाईफस्टाईल

अचानक वजन वाढतंय अन् थकवाही जाणवतोय, वेळीच व्हा सावध; असू शकतात थायरॉईडचे संकेत

आजकाल थायरॉईड ही समस्या सामान्य होत चालली आहे. थायरॉईड हा एक सामान्य आजार नसून हळूहळू अवयवांवर परिणाम करणारा सायलेंट डिसऑर्डर आहे.

Krantee V. Kale

आजकाल थायरॉईड ही समस्या सामान्य होत चालली आहे. थायरॉईड हा एक सामान्य आजार नसून हळूहळू अवयवांवर परिणाम करणारा सायलेंट डिसऑर्डर आहे. पूर्वी ही समस्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून यायची परंतु आता पुरुषांमध्येही याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेकदा लोक थायरॉईडच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.परंतु ही लक्षणे ओळखली नाही तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. थायरॉईड झाल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.

थायरॉईडची लक्षणे कोणती?

  • अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे- जर अचानक वजन वाढत असेल किंवा कमी होत असेल तर हे थायरॉईडचे संकेत आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

  • थकवा आणि अशक्तपणा- थकवा आणि अशक्तपणा हे थायरॉईडचे मुख्य लक्षण आहे. झोप पूर्ण झाल्यानंतरही किंवा आराम करुनही थकवा जाणवणे किंवा शरीरात ऊर्जा न वाटणे हे थायरॉईड हार्मोन्स असंतुलित झाल्याचे संकेत आहे.

  • मूड स्विंग्स आणि डिप्रेशन- थायरॉईड वाढल्यास चिडचिड होणे, एंग्झायटी येणे आणि उदास वाटणे अशा समस्या उद्भवू शकतात. लोक अनेकदा या समस्यांकडे मानसिक ताण समजून दुर्लक्ष करतात. मात्र, याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

  • केस आणि त्वचेवर परिणाम- थायरॉईडने ग्रस्त लोकांचे केस जास्त प्रमाणात गळतात. अनेकदा याचा परिणाम भुवयांच्या केसांवरही दिसतो. याशिवाय, त्वचा निस्तेज आणि कोरडी पडते.

  • थंडी किंवा उष्णता सहन न होणे- थायरॉईड शरीराच्या अंतर्गत तापमानावर परिणाम करते. हायपोथायरॉईडीझममुळे एखाद्या व्यक्तीला थंडी जाणवू शकते, तर हायपरथायरॉईडीझममुळे त्याला जास्त उष्णता जाणवू शकते. याचा परिणाम शरीरातील मेटाबॉलिजम रेटवर होऊ शकतो.

  • अनियमित मासिक पाळी- थायरॉईडच्या समस्यांमुळे महिलांमध्ये फर्टिलिटीची समस्या, अनियमित मासिक पाळी तसेच,जास्त किंवा कमी रक्तस्त्राव जाणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पुरुषांमध्येही हार्मोनल असंतुलन होऊ शकते.

कशी काळजी घ्यावी?

थायरॉईडची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. यासह, तुमच्या आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा आणि वेळेवर औषधे घ्या. तसेच, बाहेरचे प्रक्रिया केलेले अन्न, साखरयुक्त पेय आणि जास्त सोडियम असलेले पदार्थ खाणं टाळा. याव्यतिरिक्त दररोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम करा.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

GST अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम; जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार