Summer Health Tips : उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळायचंय? आहारात घ्या 'हे' पदार्थ 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Summer Health Tips : उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळायचंय? आहारात घ्या 'हे' पदार्थ

उन्हाळ्यात चुकीचा आहार शरीरातील उष्णता वाढवू शकतो. कोणते पदार्थ टाळावेत आणि शरीराला थंडावा देणारे हेल्दी पर्याय कोणते जाणून घ्या.

किशोरी घायवट-उबाळे

देशभरात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून, उकाड्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. कडक उन्हाळ्यात फक्त पाणी पिणं पुरेसं नसतं, तर आहारात योग्य बदल करणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. चुकीचे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवू शकतात, तर योग्य अन्नपदार्थ शरीराला थंडावा देण्यास मदत करतात.

पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ सलोनी यांनी सोशल मीडियावर उन्हाळ्यातील योग्य आहाराबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मते, उष्ण हवामानात चुकीचा आहार घेतल्यास शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.

उन्हाळ्यात कोणते पदार्थ कमी खावेत?

उन्हाळ्यात काही पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात आणि डिहायड्रेशनचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे खालील पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भाजलेले शेंगदाणे, मिक्स ड्रायफ्रूट्स, शेंगदाणा चिक्की, कोला, पॅकेज्ड ज्यूस, जास्त प्रमाणातील आंबा, चिकू, अननस, खजूर, मनुका, ओवा, काळी मिरी आणि लवंग यांसारखे पदार्थ शरीरात उष्णता वाढवू शकतात.

शरीराला थंडावा देणारे पर्याय

उन्हाळ्यात हलका, पचायला सोपा आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेला आहार अधिक फायदेशीर ठरतो. तज्ज्ञांच्या मते, खालील पर्याय शरीराला थंडावा देण्यासाठी उपयुक्त आहेत.

सब्जा ड्रिंक, भिजवलेले बदाम, ताजं नारळ, लिंबूपाणी, नारळपाणी, बेलाचं सरबत, कलिंगड, खरबूज, डाळिंब, ताजी अंजीर, भिजवलेली अंजीर, हंगामी फळं, जिरे, धणे आणि बडीशेप हे पदार्थ शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करू शकतात.

हे बदल का महत्त्वाचे?

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता वेगाने वाढते. अशावेळी पाण्याने समृद्ध आणि हलके पदार्थ खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहतं. तसेच पचनक्रिया सुधारते आणि थकवा कमी होतो. योग्य आहारामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.

उन्हाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष

उष्णतेच्या दिवसांत आहारातील छोटे बदलही आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. योग्य पदार्थांची निवड केल्यास उकाड्यातील त्रास कमी होऊ शकतो आणि शरीर अधिक ताजेतवाने राहू शकतं. उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या पदार्थांना प्राधान्य देणं हे आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.

(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

'४८ तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशव्यापी आंदोलन'; CJP च्या अभिजीत दिपकेंचा ज्ञानेश कुमार यांना इशारा

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

बंगळुरूतील CEO ची मोठी घोषणा; "४ राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही", सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ठाण्यातील क्लस्टर, पुनर्विकासाला गती; १५ वर्षांत ३० लाख घरांचे लक्ष्य, सिद्धेश्वर नगरचे काम तीन वर्षांत पूर्ण करणार

IIT Bombay Student Suicide Case : साहिल वाकोडेचे वडील पोलिसांच्या ताब्यात; उपोषणासाठी IIT बॉम्बेकडे जाताना रोखले