प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik
लाईफस्टाईल

Summer Fashion Trends 2025 : महाराष्ट्रात यंदाच्या उन्हाळ्यात कोणते कपडे देईल तुम्हाला स्टाईलिश लूक

उन्हाळा सुरू होताच अतिगडद रंगाचे कपडे, तसेच स्कीन टाईट फिटिंगच्या कपड्यांना बाय बाय करावे लागते. उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे तुम्हाला आरामदायक ठरतील सोबतच स्टाईलिश लूकही देतील याचा विचार करत आहात? चला जाणून घेऊया काय आहेत महाराष्ट्रातील कपड्यांचे फॅशन ट्रेंड्स - (Summer Fashion Trends 2025)

Kkhushi Niramish

उन्हाळा सुरू होताच अतिगडद रंगाचे कपडे, तसेच स्कीन टाईट फिटिंगच्या कपड्यांना बाय बाय करावे लागते. उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे तुम्हाला उन्हाळ्यात आरामदायक ठरतील सोबतच स्टाईलिश लूक ही देतील याचा विचार करत आहात? चला जाणून घेऊया काय आहेत महाराष्ट्रातील कपड्यांचे फॅशन ट्रेंड्स - (Summer Fashion Trends 2025)

आल्हाददायक रंगाचे कपडे

तीव्र उन्हाळ्यात सामान्यपणे डोळ्यांना आल्हाददायक आणि सुखद अनुभव देणारे गुलाबी, पिस्ता, हिरवा, निळ्या रंगांच्या छटा असलेले कपडे तुम्हाला एक वेगळा आणि छान स्टाईलिश लूक देऊ शकतात.

भरतकाम केलेले कपडे

सामान्यपणे उन्हाळ्यात खूप जड नक्षीकाम असणाऱ्या कपड्यांपेक्षा नाजूक भरतकाम केलेले कपडे वापरण्याकडे फॅशन ट्रेंड दिसून येत आहे. यामध्ये पारंपारिक भारतीय कलाकारी नव्या रुपात पाहायला मिळू शकते.

स्टाइलिश एथनिक वेअर

एथनिक वेअर हे कपडे अधिकतर हातमागावरील कपडे असतात. यावर महाराष्ट्रातील पारंपारिक वारली चित्र कला पाहायला मिळते. सध्या एथनिक वेअरमध्ये वन पिस, लाँग स्कर्ट हे यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा ट्रेंडिंगमध्ये येण्याची शक्तयता आहे.

डबल डेनिम

डबल डेनिम हे एक सुंदर फॅशन फ्यूजन आहे, जे कामाच्या ठिकाणी एक स्टायलिश लूक क्रिएट करतो.

फुलांच्या प्रिंटेड लेगिंग्ज

लेगिंग्जमध्ये यंदा नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहेत. यामध्ये बारीक फुलाफुलांचे नक्षीकाम असलेल्या लेगिंग्ज आणि त्यावर कॉटनचे प्लेन कुर्ते असे ट्रेंड सुरू असून यात तुम्हाला एकदम कूल लूक मिळतो. याशिवाय श्वास घेण्यासाठी योग्य अशा कपड्यांवर भर दिला जात आहे.

मुंबईच्या उष्ण आणि दमट हवामानात, श्वास घेण्यायोग्य कापड, सैल छायचित्र आणि घालण्यास सोप्या शैलींवर लक्ष केंद्रित केले जाईल.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक