Summer Special : शेवई, सब्जा आणि गुलाब सिरपचा शाही संगम; घरीच बनवा थंडगार फालुदा, वाचा रेसिपी  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Summer Special : शेवई, सब्जा आणि गुलाब सिरपचा शाही संगम; घरीच बनवा थंडगार फालुदा, वाचा रेसिपी

उन्हाळ्यात थंडगार आणि गोड काहीतरी खायचे आहे? मग घरच्या घरी बनवा शाही फालुदा. शेवई, सब्जा, गुलाब सिरप आणि मिल्कमेडपासून तयार होणारी ही सोपी आणि स्वादिष्ट फालुदा रेसिपी नक्की ट्राय करा.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळ्यात काहीतरी थंड, गोड आणि रिफ्रेशिंग खायची इच्छा झाली की फालुदा हा एकदम परफेक्ट पर्याय ठरतो. गुलाब सिरपचा सुगंध, शेवईची मऊसर चव, सब्जा बियांचे थंडगार टेक्स्चर आणि वरून ड्रायफ्रुट्सची कुरकुरीत सजावट… असा प्रत्येक चमचा तोंडात विरघळणारा फालुदा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो.

मुघलई खानपानातून लोकप्रिय झालेला फालुदा हा केवळ डेझर्ट नाही, तर उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारा खास गोड पदार्थ आहे. खास पाहुणे घरी येणार असतील किंवा संध्याकाळी काहीतरी शाही आणि झटपट बनवायचे असेल, तर ही फालुद्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.

साहित्य (६ जणांसाठी) :

  • १ टिन मिल्कमेड

  • २ मोठे चमचे सब्जा बिया

  • ६ मोठे चमचे शेवई

  • १२ छोटे चमचे गुलाब सिरप

  • ६ कप क्रश्ड आईस

  • १ मोठा चमचा ड्रायफ्रुट्स (बदाम, काजू, पिस्ता)

कृती :

सर्वप्रथम सब्जा बिया १ तास पाण्यात भिजत ठेवा. त्या छान फुगल्या की वापरण्यासाठी तयार होतील. दुसरीकडे शेवई उकळत्या पाण्यात ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या. नंतर पाणी गाळून शेवई बाजूला ठेवा.

फालुद्याचे लेयर्स तयार करा

एका उंच ग्लासच्या तळाशी १ छोटा चमचा गुलाब सिरप घाला. त्यावर १ मोठा चमचा शिजवलेली शेवई घाला. नंतर १ मोठा चमचा भिजवलेल्या सब्जा बिया घाला. त्यावर १ मोठा चमचा मिल्कमेड घाला. शेवटी ५ मोठे चमचे क्रश्ड आईस घाला. याच क्रमाने पुन्हा एक लेयर तयार करा. त्यानंतर वरून ड्रायफ्रुट्स घालून सजवा. सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करा आणि थंडगार फालुदा लगेच सर्व्ह करा.

टिप्स :

  • शेवई जास्त शिजवू नका. ती थोडी चिवट राहिली तर फालुद्याची चव छान लागते.

  • या रेसिपीत वेगळी साखर घालण्याची गरज नाही. मिल्कमेड आणि गुलाब सिरपमुळे पुरेसा गोडवा येतो.

  • चांगल्या दर्जाचा गुलाब सिरप वापरल्यास फालुद्याला बाजारासारखी चव येते.

  • फालुद्यात स्ट्रॉबेरी, आंबा किंवा डाळिंब घालून फ्रुटी ट्विस्ट देऊ शकता.

  • वरून पिस्ता, बदाम, काजू घातल्यास कुरकुरीत चव येते.

  • फालुदा नेहमी बर्फासारखा थंड सर्व्ह करा.

  • अधिक शाही चव हवी असेल तर वरून कुल्फी किंवा व्हॅनिला आईस्क्रीम घाला.

IIT Bombay Student Suicide Case : साहिल वाकोडेचे वडील पोलिसांच्या ताब्यात; उपोषणासाठी IIT बॉम्बेकडे जाताना रोखले

ठाण्यातील क्लस्टर, पुनर्विकासाला गती; १५ वर्षांत ३० लाख घरांचे लक्ष्य, सिद्धेश्वर नगरचे काम तीन वर्षांत पूर्ण करणार

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

राज्यात ४७ नवीन अतिरिक्त तहसीलदार कार्यालये

काळजाचा थरकाप! यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या बसला आग, ९ जणांचा मृत्यू, चालक-वाहकावर प्रवाशांचा गंभीर आरोप