आता ज्यूस नको घरच्या घरी बनवा संत्र्याचा सोडा; उकाड्यात देईल दिलासा 
लाईफस्टाईल

Summer Special : आता ज्यूस नको घरच्या घरी बनवा संत्र्याचा सोडा; उकाड्यात देईल दिलासा

उन्हाळ्यात रोजच ज्यूस कंटाळवाणा वाटत असेल, तर घरच्या घरी बनवलेला संत्र्याचा सोडा हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. संत्र्याची आंबट-गोड चव, पुदिन्याचा ताजेपणा आणि सोड्याची फिज यामुळे हा ड्रिंक खूपच रिफ्रेशिंग वाटतो. सोपी रेसिपी वापरून घरीच बनवा आणि उकाड्यात मिळवा थंडावा.

Mayuri Gawade

उन्हाळा म्हटलं की थंडगार पेयांची आठवण येते. सरबत आणि ज्यूस आपण नेहमीच पितो, पण यंदा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर घरच्या घरी बनवलेला संत्र्याचा सोडा एकदम परफेक्ट पर्याय ठरतो. आंबट-गोड संत्र्याची चव, पुदिन्याचा ताजेपणा आणि सोड्याची फिज यामुळे हा ड्रिंक प्रकार केवळ चविष्टच नाही, तर खूपच रिफ्रेशिंग वाटतो.

बाजारातील रेडीमेड ड्रिंक्सपेक्षा हा सोडा अधिक नैसर्गिक आणि आपल्या चवीप्रमाणे बनवता येतो. गरमीमुळे थकवा, घाम आणि शरीरातील पाण्याची कमतरता जाणवत असेल, तर हा संत्र्याचा सोडा लगेच फ्रेश वाटायला मदत करतो.

साहित्य :
संत्री, साखर, लिंबू, मीठ, पुदिना, बर्फ, सोडा

कृती :

सर्वप्रथम संत्री सोलून त्याचा रस काढून घ्या.
हा रस मिक्सरमध्ये घालून त्यात साखर, लिंबाचा रस, मीठ आणि पुदिन्याची पाने टाका.
सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत ब्लेंड करा.
नंतर हे मिश्रण गाळून घ्या, म्हणजे चोथा वेगळा होईल.
ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून त्यावर तयार मिश्रण ओता.
शेवटी थंड सोडा घालून हलकेच ढवळा.

तयार झालेला संत्र्याचा सोडा लगेच सर्व्ह करा. वरून पुदिन्याची पाने किंवा संत्र्याचा स्लाइस घालून सजवल्यास तो अधिक आकर्षक दिसतो.

संत्र्याचा सोडा पिण्याचे फायदे

  • संत्र्यामधील व्हिटामिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

  • शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत

  • लिंबू आणि मीठामुळे इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात

  • पुदिन्यामुळे पचन सुधारते आणि ताजेतवानेपणा मिळतो

  • उष्णतेमुळे आलेला थकवा कमी होतो

उन्हाळ्याच्या कडक उन्हात घरच्या घरी बनवलेला हा संत्र्याचा सोडा तुम्हाला ताजेतवाने ठेवेल. चव, आरोग्य आणि रिफ्रेशमेंट यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला हा ड्रिंक नक्की ट्राय करा!

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

रेल्वेच्या AC डब्यात चक्क दिवा लावून पूजा; प्रवाशाचा VIDEO चर्चेत; अशी चूक करू नका; प्रवासात 'या' वस्तू आहेत बॅन!

लातूरमध्ये माथेफिरू प्रवाशाने ओढले स्टेअरिंग; एसटी दोन स्कूलबसना धडकली, ५ जण जखमी, Video