Sunday Special Recipe : घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल मटण करी; बोटं चाटत राहाल अशी चव 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Sunday Special Recipe : घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल मटण करी; बोटं चाटत राहाल अशी चव

योग्य मसाल्यांचा वापर, मटणाचे परफेक्ट मॅरिनेशन आणि मंद आचेवर केलेला मसाला यामुळे ही ढाबा स्टाईल मटण करी अतिशय स्वादिष्ट बनते.

किशोरी घायवट-उबाळे

हॉटेल किंवा ढाब्यावर मिळणाऱ्या मसालेदार मटण करीची चव अनेकांना आवडते. पण अगदी त्याच चवीची मटण करी आता घरच्या घरीही सहज बनवता येते. योग्य मसाल्यांचा वापर, मटणाचे परफेक्ट मॅरिनेशन आणि मंद आचेवर केलेला मसाला यामुळे ही ढाबा स्टाईल मटण करी अतिशय स्वादिष्ट बनते. वीकेंड, खास पाहुणे किंवा फॅमिली डिनरसाठी ही रेसिपी उत्तम पर्याय ठरू शकते.

साहित्य :

मॅरिनेशनसाठी

  • ५०० ग्रॅम मटण

  • १/२ टीस्पून हळद

  • १ टीस्पून लाल तिखट

  • ३ टीस्पून दही

  • चवीनुसार मीठ

करीसाठी

  • २ टेबलस्पून तेल

  • १ टीस्पून जिरे

  • ३ लसूण पाकळ्या

  • २ सुक्या लाल मिरच्या

  • कढीपत्ता

  • २ कांदे (बारीक चिरलेले)

  • २ टोमॅटो (बारीक चिरलेले)

  • १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट

  • १/२ टीस्पून हळद

  • १/२ टीस्पून लाल तिखट

  • १ टीस्पून जिरेपूड

  • १ टीस्पून गरम मसाला

  • चवीनुसार मीठ

  • सजावटीसाठी कोथिंबीर

कृती :

सर्वप्रथम मटण स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून टाका. त्यात हळद, लाल तिखट, दही आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण २० ते ३० मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवा.

मॅरिनेट केलेले मटण प्रेशर कुकरमध्ये घ्या. त्यात हळद, लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला, तेल आणि अर्धा कप पाणी घालून मटण मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.

कढईत तेल गरम करून त्यात जिरे, लसूण, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या. त्यानंतर कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता. आता आलं-लसूण पेस्ट आणि थोडी कोथिंबीर घालून परता. चिरलेले टोमॅटो घालून ते पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवा. आता शिजवलेले मटण आणि त्याचा रस्सा या मसाल्यात घाला. झाकण ठेवून मंद आचेवर १० ते १५ मिनिटे शिजवा. शेवटी वरून कोथिंबीर भुरभुरवा आणि गरमागरम ढाबा स्टाईल मटण करी भाकरी, तंदुरी रोटी, नान किंवा जिऱ्याच्या भातासोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • मटण किमान ३० मिनिटे मॅरिनेट केल्यास ते अधिक मऊ आणि रसाळ होते.

  • कांदा व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत परतल्यास ग्रेव्हीला ढाबा स्टाईल रंग आणि चव मिळते.

  • अधिक तिखट चव हवी असल्यास लाल तिखटाचे प्रमाण वाढवू शकता.

  • मसाला मंद आचेवर शिजवल्यास ग्रेव्हीला अधिक छान फ्लेवर येतो.

  • सर्व्ह करताना वरून ताजी कोथिंबीर आणि थोडा गरम मसाला घातल्यास चव आणखी खुलते.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके