Freepik
लाईफस्टाईल

Surya Grahan 2025: 'या' राशीच्या लोकांनी सांभाळून राहा! सूर्यग्रहणाचा होऊ शकतो नकारात्मक प्रभाव

यंदाचे सूर्यग्रहण हे शनि अमावस्येला आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांवर हे सूर्यग्रहण नकारात्मक परिणाम देऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांना सूर्यग्रहणात सांभाळून राहावे लागेल. काय होणार परिणाम?

Kkhushi Niramish

वर्ष २०२५ चे पहिले सूर्यग्रहण २९ मार्चला मीन राशीत लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण नकारात्मक मानले गेले आहे. असे असले तरी ते काही राशीच्या लोकांना लाभदायक ठरते तर काही राशीच्या लोकांना खूपच वाईट परिणाम देते. यंदाचे सूर्यग्रहण हे शनि अमावस्येला आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांवर हे सूर्यग्रहण नकारात्मक परिणाम देऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांना सूर्यग्रहणात सांभाळून राहावे लागेल. काय होणार परिणाम?

कर्क राशी - गाडी चालवताना काळजी घ्या

कर्क राशीच्या लोकांनी गाडी चालवताना काळजी घेण्याची गरज आहे. तसेच सूर्यग्रहण समयी आर्थिक समस्या उद्भवू शकतात. खर्च वाढेल. गुंतवणूक करणार असाल तर निर्णय चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांभाळून राहावे लागेल.

मेष राशी - कोणावरही अतिविश्वास ठेवू नका

मेष राशीच्या लोकांनी एखाद्यावर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणावरही अतिविश्वास ठेवणे जोखमीचे ठरू शकते. आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आरोग्यालाही जपावे लागणार आहे.

धनु राशी - कामाच्या ठिकाणी पंगा घेऊ नका

धनु राशीच्या लोकांना सूर्यग्रहण काळाचा नकारात्मक प्रभाव स्पष्ट जाणवेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजून नसेल. त्यामुळे कोणाशीही पंगा घेण्याच्या भानगडीत पडू नका. तसेच पैशांच्या बाबतीतही फसवणूक होण्याचा धोका असू शकतो. पालकांच्या आरोग्याची चिंता वाढू शकते.

तुला किंवा तूळ राशी - जोडीदारासोबतचे नात्यात गैरसमज होऊ शकतात

तूळ राशीच्या लोकांना सूर्यग्रहण आर्थिक नुकसान देणार नाही. मात्र, या काळात कौटुंबिक कलहला सामोरे जावे लागू शकते. जोडीदारासोबतच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सुसंवाद ठेवा आणि काळजीपूर्वक बोला.

वृश्चिक राशी - अपघातांचा धोका

वृश्चिक राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाच्या काळात नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळा आणि नकारात्मक विचारांपासून दूर रहा. अपघातांचा धोका देखील वाढू शकतो, म्हणून अधिक काळजी घ्या.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!