उन्हाळा सुरू असल्यामुळे पेय पदार्थ घेण्याचे प्रमाण वाढले आहे. उकाड्यामुळे सातत्याने काही ना काही गार पेय प्यावेसे वाटतात. उन्हाळ्यामुळे थकवा जास्त जाणवतो त्यामुळे सहजच एनर्जी ड्रिंक, सोडा, ब्लेंडेड कॉफी पिण्याचे प्रमाण वाढते. मात्र, यामुळे मधुमेहाचा धोका होऊ शकतो. जाणून घ्या कोणत्या ड्रिंक्समुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
गार सोडा
उन्हाळ्यात अनेक जण गार सोडा पिण्यास प्राधान्य देतात. मात्र, यामध्ये जवळपास ८ ते १० चमचे साखर असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाचा धोका संभवू शकतो. त्या ऐवजी लिंबू पाणी, नारळ पाणी, काकडीचे पाणी पिणे जास्त आरोग्यदायी ठरू शकते.
आर्टिफिशियल स्वीटनर ड्रिंक्स
आर्टिफिशियल स्वीटनर ड्रिंक्समध्ये साखर नसते. त्यामुळे साखर मुक्त पेय पदार्थ म्हणून यांचा वापर केला जातो. मात्र, आर्टिफिशियल स्वीटनर मेटाबॉलिज्मला हानी पोहोचवू शकतात. यामुळे इंन्सुलिन रेसिस्टंट्स वाढवू शकतात. त्यामुळे शक्यतो पेय पदार्थांमध्ये आर्टिफिशियल स्वीटनर घालणे टाळलेलेच योग्य असते.
एनर्जी ड्रिंक
मार्केटमध्ये अनेक प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स मिळतात. तुम्हाला हे पेय पिण्यासाठी आवडत असेल तर सावधान हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कारण या एनर्जी ड्रिंक्समध्ये मोठ्या प्रमाणात उच्च पातळीचे कॅफीन असते. तसेच साखरेचे प्रमाण सुद्धा खूप जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची दाट शक्यता असते. तसेच या घटकांमुळे एनर्जी ड्रिंक पिऊनही थकवा दूर होत नाही. तर याऊलट थकवा वाढू शकतो.
Blended (ब्लेंडेड कॉफी)
ब्लेंडेड कॉफीमध्ये ३०० ते ४०० इतक्या प्रमाणात कॅलरीज असतात. यामुळे तुमच्या रक्तात साखरेची पातळी तातडीने वाढू शकते. त्यामुळे ब्लेंडेड कॉफीपासून लांब राहणे हेच योग्य आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)