लाईफस्टाईल

त्वरीत बदला 'या' ७ सवयी, नाहीतर ऐन तारुण्यात दिसाल म्हातारे

Suraj Sakunde
वय वाढणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला सर्वांनाच सामोरं जावं लागतं. परंतु काही गोष्टींमुळं तुम्ही तारुण्यातही जास्त वयाचे दिसू लागता.
आनुवंशिकतेशिवाय चुकीची जीवनशैली, प्रदूषण, अयोग्य आहार इत्यादी गोष्टींचा परिणाम तुमच्या तारूण्यावर होतो.
जर तुम्हालाही जास्त दिवस तरुण दिसावं असं वाटत असेल, तर काही सवयी बदलणं गरजेचं आहे.
चायनिज फूड, जंक फूड, फास्टफूड खाण्यामुळं तुमच्या त्वचेवर मोठा परिणाम होतो. आणि एजिंग प्रक्रिया फास्ट होते.
जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, एरोबिक्ससारख्या फिजिकल एक्टिव्हिटीमुळं तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसता.
शरीराचं काम व्यवस्थित चालण्यासाठी पाणी अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळं तुमची त्वचा निरोगी राहते.
धुम्रपानाच्या सवयीमुळं चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात किंवा चेहराही निस्तेज होतो.
दारु पिण्यामुळं डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरं जावं लागतं. सोबतच लिव्हरही खराब होतो. अशा परिस्थितीत होणाऱ्या आजारांमुळं अकाली वृद्धपण येतं.
सतत तणावात राहिल्यामुळं शरीरात कार्टिसोल नामक होर्मोन रिलीज केलं जातं. हे बॅड हार्मोन असून एजिंग वाढवतं.
अपुऱ्या झोपेमुळं शरीर आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळं तुमचं वय जास्त दिसू लागतं.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस