FP Photo
लाईफस्टाईल

७१ वर्षांनंतर यंदा सोमवारपासून श्रावणाची सुरुवात; १८ वर्षांनंतर ५ श्रावणी सोमवार असलेला महिना

Shravani Somvar: वर्ष १९५३ मध्ये शेवटच्या वेळी श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती. तब्बल ७१ वर्षांनंतर यंदा हा योग पुन्हा आला आहे. त्यासोबतच १८ वर्षांनंतर ५ श्रावणी सोमवार असलेला हा महिना असेल.

Swapnil S

उमेश पठाडे/ छत्रपती संभाजीनगर

वर्ष १९५३ मध्ये शेवटच्या वेळी श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती. तब्बल ७१ वर्षांनंतर यंदा हा योग पुन्हा आला आहे. त्यासोबतच १८ वर्षांनंतर ५ श्रावणी सोमवार असलेला हा महिना असेल.

श्रावण महिना हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः शिवभक्तांसाठी हा महिना अत्यंत श्रद्धेचा असतो. श्रावण सोमवारी भगवान शिवाची उपासना, उपवास आणि विविध धार्मिक अनुष्ठान आयोजित केली जातात. यंदा, तब्बल १८ वर्षांनंतर ५ श्रावणी सोमवार येत आहेत. त्यामुळे हा महिना शिवभक्तांसाठी विशेष ठरणार आहे.

श्रावण सोमवारी मंदिरांमध्ये विशेष पूजेचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात जातात. या दिवशी व्रत ठेवणे, फळाहार करणे आणि शिवलिंगावर जल अर्पण करणे याला विशेष महत्त्व दिले जाते.

या पवित्र महिन्यात शिवभक्त विविध प्रकारे भगवान शिवाची आराधना करतात. गंगा जलाने अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि रुद्राभिषेक ही काही प्रमुख पूजा पद्धती आहेत. श्रद्धाळू भक्तांच्या मते, या महिन्यात केलेली पूजा आणि व्रत विशेष फलदायी ठरतात.

७१ वर्षांनंतर येणाऱ्या या योगामुळे श्रद्धाळू भक्तांमध्ये विशेष उत्साह आहे. विशेषतः, ५ श्रावणी सोमवार येण्याचा योग आणि सोमवारी श्रावणाची सुरुवात हा धार्मिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा क्षण आहे.

५ ऑगस्टला दुपारी ३ वाजून २२ मिनिटांपासून चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल त्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच चंद्र गुरुपासून चौथ्या केंद्रस्थानात असणार आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळ'बाबतही फैसला

मुंबई एअरपोर्टवर सोनं तस्करीच्या नव्या 'जुगाड'चा पर्दाफाश! ₹२.१५ कोटींचे सोने जप्त, बांगलादेशी प्रवाशासह एक कर्मचारी अटकेत

ट्रेनमधून उतरवले, ५ तास ताटकळले! देशातल्या आघाडीच्या ॲथलिट्ससोबत पनवेल स्टेशनवर गैरवर्तनाचा Video व्हायरल

'राईचा पर्वत करू नका…'; घटस्फोटाच्या चर्चांवर नेहा कक्करचं स्पष्टीकरण; म्हणाली, माझ्या नवऱ्याला...

उल्हासनगरमध्ये शिवसेनेचाच महापौर; वंचितचा निर्णायक पाठिंबा, भाजप विरोधी बाकांवर बसणार