लाईफस्टाईल

Valentine’s Day Special : घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा टेस्टी केक; नोट करा स्पेशल रेसिपी

व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी बाजारातून केक आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला केक अधिक खास ठरतो. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने हा केक घरच्या घरी तयार करता येतो.

किशोरी घायवट-उबाळे

व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी बाजारातून केक आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला केक अधिक खास ठरतो. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने हा केक घरच्या घरी तयार करता येतो.

साहित्य :

  • मैदा - १ कप

  • साखर - पाऊण कप

  • दूध - अर्धा कप

  • तेल / वितळलेलं बटर - पाव कप

  • बेकिंग पावडर - १ टीस्पून

  • बेकिंग सोडा - पाव टीस्पून

  • कोको पावडर - २ टेबलस्पून (चॉकलेट केकसाठी)

  • व्हॅनिला एसेंस - १ टीस्पून

  • मीठ - चिमूटभर

कृती :

एका भांड्यात मैदा, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ चाळून घ्या. त्यात दूध आणि तेल घालून बॅटर गुळगुळीत होईपर्यंत नीट मिसळा. आता कोको पावडर किंवा व्हॅनिला एसेंस घालून हलक्या हाताने मिक्स करा. केक टिनला तेल लावून थोडा मैदा भुरभुरावा आणि त्यामध्ये बॅटर ओता. कुकरमध्ये मीठ घालून ५ मिनिटे कुकर गरम करा, त्यात टिन ठेवा आणि झाकणावरची शिट्टी काढा. मध्यम आचेवर ३०-३५ मिनिटे केक शिजवा. त्यानंतर टूथपिक घालून केक तपासा. टूथपिक कोरडी राहिली तर समजा केक तयार.

टिप्स :

  • बॅटर फार घट्ट किंवा फार पातळ करू नका.

  • कुकरमध्ये केक करताना शिट्टी लावू नका.

  • केक थंड झाल्यावरच सजावट करा.

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी