लाईफस्टाईल

Valentine's Week : फेब्रुवारीत प्रेमाचा उत्सव! कोणत्या दिवशी कोणता डे? वाचा एका क्लिकवर

व्हॅलेंटाईन वीकमधील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व असून प्रेम, विश्वास, काळजी आणि नात्यांची घट्ट बांधिलकी यांचे प्रतीक म्हणून हा आठवडा साजरा केला जातो.

किशोरी घायवट-उबाळे

Valentine Week 2026 : फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रेमाच्या आठवड्याची म्हणजेच व्हॅलेंटाईन वीकची चाहूल लागते. व्हॅलेंटाईन वीकमधील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व असून प्रेम, विश्वास, काळजी आणि नात्यांची घट्ट बांधिलकी यांचे प्रतीक म्हणून हा आठवडा साजरा केला जातो. गुलाब देऊन भावना व्यक्त करण्यापासून ते एकत्रपण साजरे करण्यापर्यंत या आठवड्यातील प्रत्येक दिवस वेगळी भावना दर्शवतो.

विद्यार्थी, मित्र, प्रेमी युगुलांसह कुटुंबीयही या आठवड्यात शुभेच्छा, भेटवस्तू आणि प्रेमळ हावभावांच्या माध्यमातून सहभागी होताना दिसतात.

'व्हॅलेंटाईन वीक' म्हणजे काय?

व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साजरा होणारा प्रेम आणि भावना व्यक्त करण्याचा खास आठवडा आहे. फक्त एकाच दिवशी प्रेम साजरे न करता, या आठवड्यात वेगवेगळ्या दिवसांतून वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या जातात.

  • सुरुवात : ७ फेब्रुवारी - रोज डे (Rose Day)

  • शेवट : १४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)

व्हॅलेंटाईन वीकची संपूर्ण यादी

व्हॅलेंटाईन वीकमध्ये ७ फेब्रुवारीपासून १४ फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

७ फेब्रुवारी - रोज डे (Rose Day)

गुलाब भावनांचे प्रतीक आहे. लाल गुलाब प्रेम दर्शवतो, पिवळा मैत्रीचे प्रतीक आहे, तर पांढरा गुलाब शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो.

८ फेब्रुवारी - प्रपोज डे (Propose Day)

आपल्या भावना, प्रेम किंवा आदर व्यक्त करण्यासाठीचा खास दिवस.

९ फेब्रुवारी - चॉकलेट डे (Chocolate Day)

नात्यातील गोडवा आणि आनंद दर्शवणारा दिवस.

१० फेब्रुवारी - टेडी डे (Teddy Day)

काळजी, आपुलकी आणि भावनिक सुरक्षिततेचे प्रतीक.

११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे (Promise Day)

प्रामाणिकपणा, विश्वास आणि नात्यांमधील बांधिलकी अधोरेखित करणारा दिवस.

१२ फेब्रुवारी - हग डे (Hug Day)

भावनिक उब, आधार आणि जवळीक व्यक्त करण्याचा दिवस.

१३ फेब्रुवारी - किस डे (Kiss Day)

आदर आणि प्रेम व्यक्त करणारा दिवस.

१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)

प्रेम, मैत्री आणि नात्यांमधील भावनिक बंध साजरे करण्याचा खास दिवस.

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

तरच LPG सिलिंडर सेवा बंद; PNG नियमावर भुजबळांचे स्पष्टीकरण

सुनेत्रा पवारांचा भाजपला दणका; पालकमंत्री होताच पुण्यातील महत्त्वाचे कार्यालय बारामतीला हलवले

SIT चौकशीला रुपाली चाकणकरांची दांडी

संभाजीनगरात LPG टंचाई; दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा संप; प्रवाशांचे हाल