Vat Savitri Purnima 2024: आज, २१ जून रोजी 'वट सावित्री पौर्णिमा' साजरी केली जात आहे. करवा चौथ प्रमाणेच वट सावित्री व्रत हे पतीचे दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवनाचे रक्षण करण्यासाठी पाळले जाते. या सणाला वट पौर्णिमा व्रत किंवा वट सावित्री व्रत किंवा वटपौर्णिमा असेही म्हणतात. हा एक हिंदू उत्सव आहे जो प्रामुख्याने विवाहित महिलांनी साजरा केला जातो. हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. दरवर्षी वट पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते. हा विशेष दिवस आहे जेव्हा महिला उपवास ठेवतात आणि त्यांच्या पतीच्या आशीर्वाद आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वट पौर्णिमा सहसा विवाहित स्त्रिया साजरी करतात. याच निमित्ताने तुमच्या प्रिय व्यक्तीला या खास दिनाच्या शुभेच्छा (Vat Purnima 2024 Wishes, WhatsApp Status, Images, Quotes, Messages & Greetings) पाठवू शकता.
पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
> लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो आपली दृढ साथ …
वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा!
> वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!
हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी
तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!
> दोन क्षणाचे असते भांडण
सात जन्माचे असते बंधन
कितीही आले जरी संकट
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
> एक फेरा आरोग्यासाठी,
एक फेरा प्रेमासाठी,
एक फेरा यशासाठी,
एक फेरा दीर्घायुष्यासाठी,
एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी,
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
> जीवन जेवढे महत्वाचे आहे ,
त्या जीवनात तेवढेच महत्वाचे तुम्ही ,
कधी न प्रेम होवो आपले कमी ,
हे नाते असेच राहावो सातो जन्मी ,
'वट पौर्णिमे'च्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!!
> वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुष लाभो तुम्हांला ,
एवढीच विनंती देवाला ,
सदैव मिळो मला तुमची साथ ,
एवढेच मागणे आहे परमेश्वरा ,
करते वंदन जोडूनी हाथ ,
वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)