लाईफस्टाईल

अजगराला 'किस' करणे रशियन डान्सरला पडले महागात; Video झाला व्हायरल

सोशल मीडियावर थोडेफार जास्त लाइक, व्ह्यू आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी कंटेंट क्रिएटर्स हल्ली कोणत्याही थराला जाताना दिसतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या अशाच व्हिडिओमध्ये एक रशियन डान्सर चक्क अजगराला हातात पकडून त्याच्यासोबत मस्ती करत होती. पण ही मस्ती तिला चांगलीच महागात पडली.

Swapnil S

सोशल मीडियावर थोडेफार जास्त लाइक, व्ह्यू आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी कंटेंट क्रिएटर्स हल्ली कोणत्याही थराला जाताना दिसतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या अशाच व्हिडिओमध्ये एक रशियन डान्सर चक्क अजगराला हातात पकडून त्याच्यासोबत मस्ती करत होती. पण ही मस्ती तिला चांगलीच महागात पडली.

इंस्टाग्रामवर श्कोडलेरा (Shhkodalera) नावाने अकाउंट असलेल्या डान्सर तरुणीसोबत ही घटना घडली. श्कोडलेरा विशालकाय अजगराला हातात घेऊन कॅमेऱ्यासमोर पोज देत होती. अजगर हातात असल्यामुळे ती थोडी घाबरलीही होती, पण तरी चेहऱ्यासमोरच अजगराला धरुन तिने बाजूला असलेल्या व्यक्तीकडे बघण्यासाठी मान वळवली. लगेच तिने पुन्हा अजगराच्या डोळ्यात डोळे घातले आणि ओठांनी 'किस' करण्याचा अभिनय केला. त्याच क्षणी काही कळायच्या आत अजगरानेच तिच्यावर हल्ला केला आणि नाकावर दंश केला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तरुणी चांगलीच घाबरली आणि अजगराला खाली सोडून लगेचच पळ काढला. हा व्हिडिओ सर्वप्रथम १ जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर 'ब्रूट अमेरिका'ने तो त्यांच्या इंस्टाग्रामवर अपलोड केल्यापासून चांगलाच व्हायरल झाला आहे. काही नेटकरी ही घटना मजेशीर असल्याची प्रतिक्रिया व्हिडिओखाली देत आहेत. तर, केवळ व्हिडिओ बनवण्यासाठी वन्यप्राण्यांना त्रास दिल्याबद्दल अनेकजण तिच्यावर टीकाही करत आहेत.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला