Viral Jokes In Marathi Freepik
लाईफस्टाईल

Joke of The Day: मास्तर- इंडिया गेट काय आहे?

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो मजेदार विनोद.

> मास्तर : इंडिया गेट काय आहे?
मुलगा : बासमती तांदूळ.
मास्तर : चारमिनार?
मुलगा : सिगरेट.
मास्तर : ताजमहाल?
मुलगा : चहा.
मास्तर : गाढवा! देशातील इतकी प्रख्यात स्थळं तुला माहिती नाहीत. जा, तुला नापास केलं. उद्या येताना वडिलांची सिग्नेचर आण.
दुसऱ्या दिवशी पोरगं चकचकीत कागदात गुंडाळलेलं पुडकं आणून टेबलावर ठेवतं.
मास्तर : हे रे काय?
मुलगा : बाबांची सिग्नेचर. आख्खी बाटली आणली.
मास्तर गहिवरून आले. पोराला छातीशी धरून म्हणाले, "अरे वेडा कुठला. कोण म्हणतं तू नापास झाला? तुला शंभर पैकी शंभर!"

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम