Weekend होईल आणखीनच खास! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट बटाटा सँडविच 
लाईफस्टाईल

Weekend होईल आणखीनच खास! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट बटाटा सँडविच

वीकेंड म्हणजे आराम, मस्ती आणि थोडं खास खाण्याची इच्छा. पण रोजचा उपमा, शिरा किंवा पोहे खाऊन कंटाळा आला असेल, तर आज नाश्त्यात काहीतरी वेगळं करून पाहा. कमी वेळात तयार होणारा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा बटाटा सँडविच हा एक परफेक्ट पर्याय आहे.

Mayuri Gawade

वीकेंड म्हणजे आराम, मस्ती आणि थोडं खास खाण्याची इच्छा. पण रोजचा उपमा, शिरा किंवा पोहे खाऊन कंटाळा आला असेल, तर आज नाश्त्यात काहीतरी वेगळं करून पाहा. कमी वेळात तयार होणारा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा बटाटा सँडविच हा एक परफेक्ट पर्याय आहे. कमी तेलात, सोप्या साहित्याने बनणारी ही रेसिपी नक्कीच तुमचा वीकेंड आणखी खास करेल.

साहित्य:

  • ब्रेड स्लाइस

  • उकडलेले बटाटे

  • बारीक चिरलेला कांदा

  • हिरवी मिरची

  • आलं-लसूण पेस्ट

  • हळद

  • धणे पावडर

  • जिऱ्याची पावडर

  • गरम मसाला

  • लिंबाचा रस

  • कोथिंबीर

  • बटर

  • किसलेलं चीज

  • सॉस किंवा हिरवी चटणी

  • मीठ (चवीनुसार)

  • तेल

कृती:

बटाटा सँडविच तयार करण्यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून नीट मॅश करून घ्या. कढईत थोडं तेल गरम करून त्यात जिरं टाका, नंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. कांदा मऊ झाल्यावर आलं-लसूण पेस्ट आणि मीठ घालून मिश्रण परता. त्यात मॅश केलेले बटाटे, हळद, धणे पावडर, जिऱ्याची पावडर आणि गरम मसाला घालून सगळं एकजीव होईपर्यंत नीट ढवळा. गॅस बंद करून त्यात कोथिंबीर आणि लिंबाचा रस मिसळा. आता ब्रेडच्या एका स्लाइसवर हे बटाट्याचं मिश्रण पसरवा, त्यावर किसलेलं चीज घालून दुसरी स्लाइस ठेवा. सँडविच मेकर किंवा तव्यावर बटर लावून सँडविच दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

टिप्स:

  • ब्राउन किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरल्यास नाश्ता अधिक हेल्दी होतो.

  • मुलांसाठी बनवत असाल तर मिरची कमी ठेवा.

  • स्टफिंगमध्ये थोडी कोबी, कॅप्सिकम किंवा स्वीट कॉर्न घातल्यास चव वाढते.

  • सँडविच मंद आचेवर भाजल्यास आतूनही छान शिजतं.

असा हा सोपा आणि चवदार बटाटा सँडविच वीकेंडच्या सकाळीसाठी एकदम परफेक्ट ठरेल

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन