what are the amazing health benefits of fasting  Freepik
लाईफस्टाईल

Fasting Benefits: एकादशीचा उपवास करताय? आरोग्याला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

Ashadhi Ekadashi 2024: आज आषाढी एकादशी निमित्ताने अनेकांनी उपवास केला असेल. उपवास करणे हा जरी धर्माचा प्रमुख भाग असला तरी तुम्हाला उपवास केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात.

Tejashree Gaikwad

Health Benefits of Fasting/ Upvas: आज (१७ जुलै) आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने भक्त, भाविक आवर्जून उपवास करतात. ज्यांना वर्षभर एकादशी करता येत नाही ते आवर्जून आषाढी एकादशीचा उपवास करतात. शतकानुशतके उपवास हा धर्माचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण या उपवासाचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला मिळतात. वजन कमी करण्यासाठी लोक उपवासही करतात.अगदी नियमित उपवास केल्याने तुम्ही हृदयाशी संबंधित समस्या टाळू शकता. चला जाणून घेऊया उपवासाचे काय फायदे आहेत.

रक्तातील साखर राहते नियंत्रित

उपवास केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. अभ्यासानुसार आठवड्यातून एकदा उपवास करून त्या दिवशी फक्त पाणी प्यायल्याने मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

हृदयरोगाचा धोका कमी होतो

अभ्यासानुसार उपवास केल्यास हृदयविकार कमी होऊ शकतो.

पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरतो उपवास

उपवास केल्याने शरीराची स्वतःची उपचार यंत्रणा योग्य प्रकारे काम करते. उपवासामुळे शरीर अनेक प्रकारच्या समस्यांशी स्वतःहून लढू लागते. संशोधनानुसार, ६२.३३% लोकांना उपवासाच्या वेळी अपचनाची समस्या झाली नाही, तर २७% लोकांची अपचनाची समस्या बरी झाली. याशिवाय, ज्यामुळे पचनाचे विकार बरे होतात.

शरीर डिटॉक्स करते

जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपले शरीर डिटॉक्स होते. उपवासामुळे शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर पडतात.

त्वचेसाठीही आहे फायदेशीर

फक्त वेगवगेळ्या प्रॉडक्ट्सचाच नाही तर खाण्याच्या सवयींचाही त्वचेवर परिणाम होऊ लागतो. जास्त तेल, मसाले किंवा बाहेरील अन्नामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. अशावेळी उपवास करणे फायदेशीर ठरू शकते. उपवास शरीराला डिटॉक्स करू शकतो. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन झाल्यावर शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि ज्याचा फायदा त्वचेलाही होतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त

उपवासामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. जेव्हा शरीराला दीर्घकाळ अन्नापासून वंचित ठेवले जाते, तेव्हा आपले शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी रोगप्रतिकारक पेशींचे पुनर्वापर करते, ज्यामुळे तुम्हाला रोगांशी लढण्यासाठी एक नवीन शक्ती मिळते.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी