फोटो : FPJ
लाईफस्टाईल

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने काय खावे? आणि काय टाळावे? नक्की वाचा

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काही खाद्यपदार्थ व सवयी टाळाव्या लागतात. रोजच्या आहारात काय खाणे टाळले पाहिजे आणि आहाराची कशी काळजी घेतली पाहिजे ते एकदा नक्की वाचा.

Krantee V. Kale

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने आपल्या आहाराचे काटेखोर पालन करायला हवे. योग्य आहार लक्षात घेऊन रोज संतुलित आहार वेळेवर घेणे महत्वाचे आहे. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काही खाद्यपदार्थ व सवयी टाळाव्या लागतात. रोजच्या आहारात काय खाणे टाळले पाहिजे आणि आहाराची कशी काळजी घेतली पाहिजे ते एकदा नक्की वाचा.

आहारात सोडियम म्हणजेच मीठ कमी करणे आवश्यक आहे, कारण जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो. आपल्या आहारात अधिक फळे आणि भाज्या समाविष्ट करा. या पदार्थांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने रोजच्या आहारात धान्य, जसे की ओट्स, ज्वारी, तांदूळ, ब्राउन राईस, यांचा समावेश करावा. यामुळे हृदयाच्या आरोग्याच्या समस्यांपासून संरक्षण मिळेल. आहारात सोयाबीन, कडधान्य अंकुरीत डाळी अश्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

शरीराला पाणी आणि हायड्रेशन जास्व आवश्यक आहे, म्हणून दररोज पुरेसे पाणी प्यावे. तसेच हळु हळु चहा आणि कॉफीचे प्रमाण कमी करावे, कारण जास्त कॅफिनही रक्तदाब वाढवू शकते.

तुमच्या आहारात फळे, भाज्या, आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स जास्त असलेले पदार्थ समाविष्ट करा, जसे की माशामध्ये असतात. त्याचबरोबर, ताज्या पदार्थांचा वापर करा. चांगल्या आहारासोबत शारीरिक हालचाल करायला हवी त्यासाठी व्यायामही गरजेचा आहे. ताण कमी करण्यासाठी व्यायाम उत्तम पर्याय आहे.

आहारात ताज्या पदार्थांचा समावेश करा आणि प्रोसेस्ड अन्न जसे की सोडियमयुक्त अन्नपदार्थ, स्नॅक्स,जंक पदार्थ टाळा. तसेच तेलकट, तिखट, मसाल्याचे पदार्थ, गोड पदार्थ शक्यतो टाळणे गरजेचे आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी

गर्भधारणा रोखणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या गोपनीयतेचे रक्षण करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

मोहित कंबोज यांचा राजकारण संन्यास?

सी. पी. राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती; राधाकृष्णन यांना ४५२, तर रेड्डी यांना ३०० मते, विरोधकांची १४ मते फुटली