Photo - Canva 
लाईफस्टाईल

Winter Special : मुलं वारंवार आजारी पडतात? थंडीच्या दिवसांसाठी खास हेल्थ टिप्स

हिवाळा सुरु होताच वातावरणातील गारवा वाढतो आणि याचसोबत लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारख्या आजारांचे प्रमाणही वाढते. थंडीच्या दिवसांत मुलांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी होत असल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या काळात मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

नेहा जाधव - तांबे

हिवाळा सुरु होताच वातावरणातील गारवा वाढतो आणि याचसोबत लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारख्या आजारांचे प्रमाणही वाढते. थंडीच्या दिवसांत मुलांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी होत असल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या काळात मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

मुलांना फ्लू का लवकर होतो?

  • शाळा, डे-केअर आणि खेळताना मुलांचा एकमेकांशी जवळचा संपर्क असतो.

  • लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते.

  • थंडीमुळे शरीरातील ओलावा कमी होत असल्याने शरीरात संक्रमण वाढण्याचा धोका वाढतो.

हिवाळ्यात मुलांमध्ये दिसणारी सामान्य लक्षणे

  • नाक वाहणे

  • खोकला

  • घसा दुखणे

  • थकवा

  • सौम्य ताप

कधी कधी ही लक्षणे वाढून श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत घरघर यांसारखी अवस्था निर्माण होऊ शकते. अशावेळी लगेच लक्ष देणे महत्वाचे.

फ्लू लसीकरण कधी आणि का करावे?

फ्लू लसीकरण हिवाळ्याच्या सुरुवातीला किंवा हंगाम बदलण्याच्या काळात मुलांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे -

  • फ्लूचा प्रसार रोखण्यास मदत होते

  • आजार गंभीर होण्याची शक्यता कमी होते

  • शाळा बुडणे आणि वारंवार औषधे घेण्याची गरज कमी होते

लसीकरणानंतर सौम्य ताप किंवा हात दुखण्यासारखी प्रतिक्रिया येऊ शकते, परंतु ती १-२ दिवसांत कमी होते.

घरीच घेता येणारी सोपी काळजी

हिवाळ्यात मुलांना निरोगी ठेवण्यासाठी काही साध्या सवयी खूप प्रभावी ठरतात.

त्यासाठी काळजी कशी घ्याल?

मुलांना कोमट पाणी, सूप, लिंबू पाणी द्या. बाहेर जाताना टोपी, स्वेटर, स्कार्फ वापरावा. फळे, भाज्या, सूप, घरगुती गरम जेवण द्या. मुलांना ७-८ तास पुरेशी झोप मिळेल याकडे लक्ष द्या. हात धुणे, खोकताना/शिंकताना तोंड झाकणे अशा सवयी लावा.

लहान गोष्ट, मोठं संरक्षण

हिवाळ्यात थोडी अतिरिक्त काळजी, स्वच्छतेच्या सवयी, योग्य आहार, आणि फ्लू लसीकरण या सर्व गोष्टींचा उपयोग मुलांचे आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी होतो.

(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर