हिवाळ्यात सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय; 'असा' तयार करा घरगुती काढा 
लाईफस्टाईल

हिवाळ्यात सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय; 'असा' तयार करा घरगुती काढा

हिवाळ्यात सर्दी-खोकला आणि कमी प्रतिकारशक्तीसाठी पारंपरिक काढा उपयुक्त ठरतो. पण हा काढा बनवायचा कसा? जाणून घ्या काढ्याची सोपी रेसिपी...

किशोरी घायवट-उबाळे

हिवाळ्यात सर्दी, खोकला, घसा खवखवणे किंवा सतत थकवा जाणवणं ही सामान्य समस्या असते. अशा वेळी भारतीय घराघरात पिढ्यान्‌पिढ्या वापरला जाणारा काढा हा एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय मानला जातो. मसाले आणि औषधी गुणधर्म असलेल्या घटकांपासून तयार होणारा हा काढा शरीराला उष्णता देतो आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.

सर्दी-खोकल्यासोबतच पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील कफ कमी करण्यासाठी काढा उपयुक्त ठरतो. हिवाळ्यात नियमितपणे काढा पिल्याने हंगामी आजारांपासून संरक्षण मिळू शकते. काढा बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य :

  • पाणी

  • आले

  • तुळशीची पाने

  • दालचिनी

  • वेलची

  • काळी मिरी

  • गूळ

कृती :

एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात आले, तुळशीची पाने, दालचिनी, वेलची आणि काळी मिरी घाला. मिश्रण ७ ते १० मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. सुगंध येऊ लागल्यावर त्यात गूळ घालून नीट विरघळू द्या. काढा गाळून कपमध्ये ओतून घ्या.

हा काढा कोमट असतानाच पिणे अधिक फायदेशीर ठरते. हिवाळ्यात सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी काढा घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले