लाईफस्टाईल

थंडीमुळे नेलपेंट घट्ट होतेय? तर 'हे' उपाय नक्की करा

थंडी वाढली की नेलपेंट घट्ट होते. ब्रशवर नीट येत नाही आणि नखांवरही स्मूथ फिनिश मिळत नाही. मात्र काही सोप्या उपायांनी ही समस्या सहज टाळता येऊ शकते.

किशोरी घायवट-उबाळे

हिवाळ्यात सौंदर्याशी संबंधित अनेक अडचणी महिलांना भेडसावत असतात. त्यातील एक सामान्य पण त्रासदायक समस्या म्हणजे नेलपेंट कडक होणे. थंडी वाढली की नेलपेंट घट्ट होते. ब्रशवर नीट येत नाही आणि नखांवरही स्मूथ फिनिश मिळत नाही. मात्र काही सोप्या उपायांनी ही समस्या सहज टाळता येऊ शकते.

थंडीमुळे नेलपेंट घट्ट का होते?

कमी तापमानामुळे नेलपेंटमधील द्रव घटक घट्ट होतात. तसेच बाटलीत हवा गेल्यास नेलपेंट लवकर सुकण्याची शक्यता वाढते.

नेलपेंट घट्ट होऊ नये यासाठी उपाय

नेलपेंट थंड ठिकाणी ठेवू नका : नेलपेंट फ्रिजमध्ये किंवा खूप थंड जागी ठेवणे टाळा. ते नेहमी रूम टेम्परेचरवर ठेवा.

कोमट पाण्याचा वापर करा : नेलपेंटची बाटली ५ ते १० मिनिटे कोमट पाण्यात ठेवल्यास ती पातळ होते.

हलकेच बाटली फिरवा : नेलपेंट वापरण्यापूर्वी बाटली जोरात शेक न करता हातात हलकेच गोल फिरवा. यामुळे बबल्स तयार होत नाहीत.

नेलपेंट थिनर वापरा : खूप घट्ट झालेल्या नेलपेंटमध्ये २-३ थेंब नेलपेंट थिनर टाकल्यास नेलपेंट पुन्हा वापरण्यायोग्य होते.

रिमूव्हर टाकू नका : नेलपेंट पातळ करण्यासाठी त्यामध्ये रिमूव्हर टाकणे टाळा. यामुळे नेलपेंटचा रंग खराब होऊ शकतो.

झाकण घट्ट बंद ठेवा : प्रत्येक वापरानंतर नेलपेंटचे झाकण नीट बंद करा, नाहीतर त्यामध्ये हवा गेल्याने नेलपेंट लवकर सुकते.

बेस कोट वापरा : बेस कोट लावल्यास नेलपेंट स्मूथ होते आणि जास्त काळ टिकते.

तज्ज्ञांचा सल्ला

सौंदर्यतज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात नेलपेंटची योग्य काळजी घेतली तर ते खराब न होता दीर्घकाळ वापरता येते आणि नखांनाही नुकसान होत नाही.

उरुळी कांचन हुंडाबळी प्रकरण : सरपंच सासू, शिक्षक सासरे… पण घरात सुनेचा छळ; दीप्तीसोबत नेमकं काय झालं? आईने केला खुलासा

ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन! सात जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा इशारा, पुढील २४ तास ढगाळ वातावरण

समृद्धी महामार्गावरील प्रवाशांना दिलासा; १४ नवे फूड प्लाझा सुरू होणार, जाणून घ्या माहिती

Mumbai : विक्रोळीत निष्काळजीपणामुळे लाऊडस्पीकर कोसळून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल

तिजोरीत खडखडाट, विविध कामांचा आराखडा कागदावरच; महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा आरोप