हिवाळा म्हणजे थंडी, कोरडी हवा आणि आपल्या त्वचेसाठी एक मोठं आव्हान. या ऋतूमध्ये त्वचा कोरडी, निस्तेज आणि सुरकुत्या पसरलेल्या दिसू लागते. त्वचेला योग्य ओलावा आणि संरक्षण न मिळाल्यास, हे परिणाम वाढू शकतात.
बाजारातील महागडे स्किनकेअर प्रॉडक्ट्स वापरूनही अपेक्षित परिणाम न मिळणे सामान्य आहे. अशा वेळी, घरच्या घरी तयार होणारा नैसर्गिक फेस सिरम खूप उपयुक्त ठरतात. हे सिरम पूर्णपणे आयुर्वेदिक असून, त्यात कोणतेही रासायनिक घटक नसतात. त्यामुळे या हिवाळ्यात हे सिरम नक्की ट्राय करा.
सिरमसाठी लागणारे घटक:
१ चमचा बीटरूट पावडर
१ चमचा ऍलोवेरा जेल
१ चमचा गुलाब पाणी
१ व्हिटॅमिन E कॅप्सूल
१ चमचा ग्लिसरीन
१ चमचा तिळाचे तेल
तयार करण्याची पद्धत:
१. सर्व घटक स्वच्छ काचेच्या भांड्यात नीट मिसळा.
२. मिश्रण एक स्प्रेच्या बाटलीत भरा.
३. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चेहऱ्यावर लावा.
या नैसर्गिक फेस सिरममुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि निरोगी दिसू लागते. बीटरूट पावडर त्वचेवर नैसर्गिक रंग आणि चमक आणते, तर ऍलोवेरा आणि गुलाब पाणी त्वचेला पोषण देतात. व्हिटॅमिन E आणि तिळाचे तेल त्वचेला हायड्रेशन देतात आणि सुरकुत्यांपासून संरक्षण करतात.
विशेष टिप : नियमित वापर केल्यास हिवाळ्यात त्वचेवर नैसर्गिक ग्लॉ येतो, त्वचा कोरडी राहत नाही आणि चेहरा निरोगी दिसतो.
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)