Winter Clothing Tips : हिवाळ्यात स्वेटर-मफलरची कशी घ्याल काळजी? जाणून घ्या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स 
लाईफस्टाईल

Winter Clothing Tips : हिवाळ्यात स्वेटर-मफलरची कशी घ्याल काळजी? जाणून घ्या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स

हिवाळा सुरू होताच कपाटातला गरम कपड्यांचा खजिना बाहेर येतो. स्वेटर, मफलर, कार्डिगन, शॉल… पण हे कपडे जितके उबदार, तितकी त्यांची काळजीही वेगळी.

Mayuri Gawade

हिवाळा सुरू होताच कपाटातला गरम कपड्यांचा खजिना बाहेर येतो. स्वेटर, मफलर, कार्डिगन, शॉल… पण हे कपडे जितके उबदार, तितकी त्यांची काळजीही वेगळी. चुकीच्या पद्धतीने धुणे, वाळवणे किंवा साठवणूक केल्यास विण सैल होते, रंग फिका होतो आणि आवडते स्वेटर लवकर खराब होतात. तुमचे हिवाळी कपडे अनेक हंगामात नवे दिसावेत, यासाठी काही सोप्या आणि उपयोगी टिप्स…

स्वेटर धुण्याची योग्य पद्धत

  • स्वेटर थेट मशीनमध्ये टाकू नका; विण ताणते आणि आकार बिघडतो

  • कोमट पाण्यात हाताने हलक्या हाताने धुवा

  • सौम्य लिक्विड डिटर्जंटच वापरा

स्वेटर पिळू नका - हलके दाबा

  • जोरात पिळल्याने फायबर सैल होतात

  • स्वच्छ टॉवेलवर स्वेटर ठेवून हलक्या दाबाने पाणी काढा

  • टॉवेलच्याच आधाराने वाळवायला ठेवा

थेट उन्हात वाळवू नका

  • उन्हात ठेवल्यास रंग फिकट होतो आणि धागा कडक होतो

  • सावलीत, वाऱ्याच्या जागीच वाळवा

  • ड्रायरचा वापर टाळा

फोल्ड करून साठवा - टांगू नका

  • हॅंगरवर टांगल्यास स्वेटर लांबतो

  • नीट फोल्ड करून कपाटात ठेवा

  • नॅप्थलीन किंवा कपड्यांसाठी देठी ठेवल्यास कीटकांपासून संरक्षण

फुगीर धागे ओढू नका

  • स्वेटरवर आलेले छोटे गोळे ओढल्यास अधिक खराब होतात

  • फॅब्रिक शेव्हर वापरा किंवा कात्रीने हलक्या हाताने कापा

मफलरची खास काळजी

  • संवेदनशील धागे असल्याने वेगवेगळ्या रंगांचे मफलर वेगळे धुवा

  • रोल करून साठवा, क्रिजेस पडत नाहीत

लोकर कपड्यांसाठी खास शॅम्पू

  • ‘वूल शैम्पू’ किंवा ‘स्वेटर वॉश’ वापरा

  • आठवड्यातून एकदाच धुवा. जास्त धुण्याने लोकर खराब होते

थोडी काळजी, योग्य स्टोरेज आणि व्यवस्थित धुण्याची पद्धत पाळली, तर तुमचे आवडते स्वेटर आणि मफलर वर्षानुवर्षे नवे दिसतील आणि हिवाळ्यातील स्टाइलही टिकून राहील.

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत आजही १८४ कचऱ्याचे हाॅटस्पाॅट; २८६ कचराकुंडी हॉटस्पॉटपैकी १०२ ठिकाणे हटवली

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय

Thane: पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन; उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर कारवाई

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय