प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik
लाईफस्टाईल

Women’s Day Special : वर्क-लाइफ बॅलेंस कसे करावे महिलांसाठी खास टिप्स

वर्क-लाइफ बॅलेंस हा महिलांसाठीचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आजच्या काळात अनेक महिला करिअर सांभाळत घराची जबाबादारी उचलतात सोबतच त्यांना त्यांचे वैयक्तिक जीवनही चांगले राखायचे असते. अनेक वेळा महिलांना या सगळ्यांचे संतुलन साधण्यात तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी अनेकवेळा त्यांना स्वतःचे आरोग्य उत्तम राखण्यात समस्या निर्माण होतात. महिलांनो वर्क-लाइफ बॅलेंस कसे करावे यासाठी या खास टिप्स

Kkhushi Niramish

वर्क-लाइफ बॅलेंस हा महिलांसाठीचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आजच्या काळात अनेक महिला करिअर सांभाळत घराची जबाबादारी उचलतात सोबतच त्यांना त्यांचे वैयक्तिक जीवनही चांगले राखायचे असते. अनेक वेळा महिलांना या सगळ्यांचे संतुलन साधण्यात तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी अनेकवेळा त्यांना स्वतःचे आरोग्य उत्तम राखण्यात समस्या निर्माण होतात. महिलांनो वर्क-लाइफ बॅलेंस कसे करावे यासाठी या खास टिप्स

सर्वप्रथम स्वतःला थोडा वेळ द्या

दिवसाची सुरुवात स्वतःला थोडा वेळ देऊन करून करा. यामध्ये किमान १५ मिनिटे व्यायाम, १५ मिनिटे योगासन, १५ मिनिटे ध्यान प्राणायाम यासाठी द्या. त्यानंतर दिनचर्येला सुरुवात करा. यामुळे तुम्ही फोकस करून काम कराल परिणामी काम जलद होऊन तुम्ही फ्री व्हाल.

वेळेचे व्यवस्थापन करा

साधारणपणे, वेळेचे व्यवस्थापन न केल्याने ताण येऊ शकतो. म्हणून, हे टाळण्यासाठी तुमचा वेळ व्यवस्थापित करा. यासाठी, करावयाच्या कामांची यादी बनवा आणि त्यामध्ये प्राधान्यक्रमानुसार कामे लिहा आणि त्यानुसार कामे पूर्ण करत रहा, जेणेकरून ती पूर्ण करण्याचा ताण येणार नाही.

नातेसंबंधांकडे लक्ष द्या

भावनिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी मजबूत आधार प्रणालीची आवश्यकता असते. म्हणून तुमच्या प्रियजनांसोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवा, त्यांच्याशी बोला आणि गरज पडल्यास मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका. चांगले संबंध कठीण काळात बळ आणि आधार देतात.

पौष्टिक अन्न खा

निरोगी आहार शरीर आणि मनाला शक्ती देतो. म्हणून, भरपूर प्रथिने, फायबर आणि निरोगी आहाराचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. तसेच जास्त कॅफिन किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. तसेच हायड्रेटेड रहा, उत्साही आणि ताजेतवाने राहण्यासाठी भरपूर पाणी प्या.

चांगली झोप घ्या

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. म्हणून, झोपेचा एक निश्चित दिनक्रम तयार करा. संध्याकाळी स्क्रीन टाइम कमी करा आणि कमीत कमी सात तास झोप घ्या.

छंद जोपासा

तुमचे आवडीचे छंद निश्चति जोपासा. त्यासाठी वेळ काढा. यामुळे मनावरचा ताण हलका होतो. मन प्रसन्न राहते.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली