Why are emojis and Similes yellow Freepik
लाईफस्टाईल

World Emoji Day 2024: इमोजी आणि स्माईल पिवळ्या रंगाचे का असतात? जाणून घ्या रंजक माहिती

Tejashree Gaikwad

History and Importance of World Emoji Day: काळानुसार संभाषण करायची पद्धत बदलली, साधनेही बदलली. काही वर्षांपूर्वी लोक फोनवर बोलायचे. पण आता मात्र लोक कॉल करण्याऐवजी व्हॉट्सॲप किंवा अनेक मेसेजिंग ॲपवर चॅट करणे, बोलणे पसंत करतात. त्यातही टेक्स्ट वापरून चॅट न करता आजकाल मोजी किंवा स्मायलीसह चॅट करण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. खरं तर, आता चॅटमध्ये इमोजी किंवा स्मायलीचा वापर फक्त हसण्यासाठी नाही तर लोक त्यांच्या भाव-भावना व्यक्त करण्यासाठी देखील वापरतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की इमोजीचा रंग लाल किंवा काळा का नाही? त्याचा रंग पिवळाच का असतो? चला, आज जागतिक इमोजी दिनानिमित्त या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.

दरवर्षी १७ जुलैला वर्ल्ड इमोजी डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे इमोजींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचे महत्त्व स्वीकार करणे.

जागतिक इमोजी दिनाचे महत्त्व काय आहे?

या दिवसाचे महत्त्व केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नाही. भाषेतील अडथळे पार करून, विविध संस्कृतींना जोडण्यात आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यात इमोजी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच या दिवसाला महत्त्व आहे.

काय आहे कारण?

इमोजी बहुतेक पिवळ्या रंगाचे असतात, यामागे वेगवगेळी कारणे असतात. एक कारण म्हणजे इमोजीचा पिवळा रंग आपल्या त्वचेच्या टोनशी आणि लोकांशी जुळतो. या रंगाशी माणूस पटकन कनेक्शन होऊ शकतो म्हणूनच, इमोजीला पिवळा रंग देण्यात आला. जेव्हा एखादी व्यक्ती हसते किंवा हसते तेव्हा त्याचा चेहरा फिकट गुलाबी दिसतो, म्हणून इमोजीचा रंग पिवळा म्हणून दिला गेला. तर बऱ्याच, लोकांचा असा विश्वास आहे की पिवळा रंग खूप उत्साही आणि आनंदाचे प्रतीक आहे. यामुळे इमोजीला पिवळा रंग देण्यात आला आहे.

सगळ्यात जास्त कोणती ईमोजी वापरली जाते?

अनेक इमोजी उपलब्ध आहेत. पण अशी एक ईमोजी आहे जी सर्वात जास्त वापरल्या जातात. आनंदाचे अश्रू ढाळणारे, म्हणजेच हसणारे इमोजी हे जगातील सर्वाधिक वापरलेले आणि आवडलेल्या इमोजी आहेत.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत