Not only smoking but 'these' factors can also cause lung cancer Freepik
लाईफस्टाईल

World Lung Cancer Day: फक्त धुम्रपानच नाही तर 'या' कारणांमुळेही होऊ शकतो फुफ्फुसाचा कर्करोग

Tejashree Gaikwad

World Lung Cancer Day Symptoms: अनेक प्रकारचे कर्करोग अर्थात कॅन्सर असतात. कोणत्याही प्रकारचा कर्करोग हा किती धोकादायक आहे हे आपल्याला माहीतच आहे. यातील फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरात वेगाने पसरणारा कर्करोग आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे १८ लाख लोकांनी आपला जीव या आजारामुळे गमावला. आपल्या देशाबद्दल बोलायचे झाल्यास एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण सुमारे ६% आहे, तर एकूण ८% लोक या आजरामुळे आपला जीव गमावतात.

दिवसाचे महत्त्व

१ ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन म्हणून जगभरात मानला जातो. या दिवसाचे महत्त्व असे की, लोकांना फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जागरुकता करण्यासाठी आणि त्यापासून बचाव करण्याविषयी माहिती देण्यासाठी साजरा केला जातो. फुफ्फुसाचा कर्करोग हा धूम्रपान केल्याने होतो असे मानले जाते. पण या कारणाशिवाय कर्करोग होण्यासाठी अन्य काही गोष्टी कारणीभूत असू शकतात.

निष्क्रीय धूम्रपान (पॅसिव स्मोकिंग)

तुम्ही धुम्रपान करत नसाल, पण तुमच्या आजूबाजूला कोणी धूम्रपान करत असेल तर ते तुमच्यासाठीही तितकेच धोकादायक आहे. याला निष्क्रिय धूम्रपान किंवा पॅसिव स्मोकिंग असे म्हणतात. हे देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण असू शकते.

वायू प्रदूषण

आजकाल बिघडलेली हवेची गुणवत्ता आणि त्यामुळे होणारे प्रदूषण हे आज फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण बनत आहे. हवेतील लहान कण आपल्या फुफ्फुसात जमा होतात, ज्यामुळे फुफ्फुसाच्या पेशींना प्रचंड नुकसान होते. ज्यामुळे दीर्घकाळात फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो.

अनुवांशिक कारणे

ज्यांच्या कुटुंबात फुफ्फुसाच्या कर्करोगाचा इतिहास आहे अशा लोकांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोकाही जास्त असतो. आकडेवारीनुसार, फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्याच्या जीन्समध्ये या रोगाचा धोका असण्याची शक्यता ६०% आहे.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला