महाराष्ट्र

राज्यात चार महिन्यांत ११० जण दगावले; राज्य आपत्ती परिस्थिती अहवालातून माहिती समोर

राज्यात १५ मे ते ३ ऑगस्टपर्यंत जोरदार पावसामुळे आतापर्यंत ११० जण दगावले असून १६३ जण जखमी तर ६ जण बेपत्ता

Swapnil S

मुंबई : राज्यात १५ मे ते ३ ऑगस्टपर्यंत जोरदार पावसामुळे आतापर्यंत ११० जण दगावले असून १६३ जण जखमी तर ६ जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती राज्य आपत्ती परिस्थिती अहवालातून समोर आली आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम आहे.

राज्यात गेल्या आठ ते १० दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. राज्यातील काही भागात तर पावसाने थैमान घातले असून राज्यात १५ मे ते ४ ऑगस्ट दुपारी ११ वाजेपर्यंत एकूण ७५६.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्याला पावसाचा फटका जोरदार बसल्याची माहिती राज्य आपत्ती परिस्थिती अहवालातून समोर आली आहे.

२ लाख नागरिकांचे स्थलांतर

या पावसामुळे आतापर्यंत एकूण २ लाख १६ हजार ४१६ जणांना फटका बसला असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. गेल्या २४ तासांत ७ हजार २६८ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर अतिवृष्टीत राज्यातील १४ ठिकाणी घरे पडल्याची नोंद करण्यात आली आहे, तर ३२७ प्राण्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून गेल्या चोवीस तासांत २ प्राण्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

३४ मदत केंद्रांत तीन हजार जणांची व्यवस्था!

राज्यात ३४ ठिकाणी मदत केंद्र सुरू केल्याची माहिती देण्यात आली. या केंद्रात आतापर्यंत तीन हजार जणांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे.

एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात!

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून राज्यात एनडीआरएफची एकूण १८ पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच एसडीआरएफचीही ६ पथके तैनात असल्याची माहिती देण्यात आली आहेत.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री