एक्स @Dev_Fadnavis
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरात १५ कोटींची गुंतवणूक; बिडकीन, डीएमआयसी विकासाला मिळणार चालना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे बिडकीन डीएमआयसीमध्ये १५,२७१ कोटी रुपयांची मेगा गुंतवणूक करण्यात आली आहे.

Swapnil S

सुजीत ताजणे / छत्रपती संभाजीनगर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे बिडकीन डीएमआयसीमध्ये १५,२७१ कोटी रुपयांची मेगा गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अवनी पॉवर बॅटरिज,जेन्सोल इलेक्ट्रॉनिक्स, अन्न व पेय क्षेत्रातील एबी इनबेव या कंपनीचा समावेश असल्यामुळे उद्योग क्षेत्राला बूस्टर मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

अवनी पॉवर बॅटरीज, जेन्सोल, एबी इनबेवमुळे उद्योग क्षेत्राला बूस्टर विधानसभा निवडणुकीपूर्वी बिडकीन डीएमआयसीमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. टोयोटा किर्लोस्करने २० हजार कोटी, जेएसडब्ल्यू ग्रीम मोबिलिटीने २७ हजार कोटी, तर अथर एनर्जीने दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. दावोस, २२ जानेवारी दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.बीड जिल्ह्यात १५,००० मेवॉ पाइपलाइन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.

शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली.

या कंपन्यांचा समावेश

कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अवनी पॉवर बॅटरिज गुंतवणूक १०,५२१ कोटी, रोजगार: ५०००, जेन्सोल इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणूक: ४०००, ५०० तसेच अन्न व पेय क्षेत्रातील एबी इनबेवगुंतवणूक : ७५० कोटी रोजगार : ३५ या कंपनीचा यात समावेश आहे. यामुळे उद्योग क्षेत्राला बूस्टर मिळाला आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास