महाराष्ट्र

माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळून २ ठार, तीन जण जखमी

माळशेज घाटात रिक्षावर अचानक दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, ३ जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

कल्याण : माळशेज घाटात रिक्षावर अचानक दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, ३ जण जखमी झाले आहेत.

या अपघातात मुंबईत राहणारे राहुल भालेराव (३०) आणि स्वयंम भालेराव (७) या काका-पुतण्यांचा मृत्यू झाला आहे. भालेकर कुटुंब मंगळवारी रात्री मुलुंडहून चंदनापुरी संगमनेर या त्यांच्या मूळ गावी रिक्षाने जात असताना माळशेज घाटातील बोगद्याजवळ महादेवाच्या मंदिर परिसरात हा अपघात झाला. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे डोंगरावरील मलबा भालेकर कुटुंबीयांच्या रिक्षावर पडला. या अपघातात चालक राहुल भालेराव आणि त्यांचा सात वर्षांचा पुतण्या स्वयम भालेरावचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

पुणे विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; घातक रसायने पुरविल्याचे उघड, आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई