संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी १७ वर्षांनंतर पूर्ण, निकाल राखीव

२००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. एनआयए न्यायालयाने सर्व पक्षकारांचे युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आदींची कसून तपासणी केली. आरोपी व सरकारी यंत्रणांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने निकालासाठी वेळ मागितला.

Swapnil S

मालेगाव : २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. हा निकाल ८ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे, असे एनआयए कोर्टाने सांगितले.

एनआयए न्यायालयाने सर्व पक्षकारांचे युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आदींची कसून तपासणी केली. आरोपी व सरकारी यंत्रणांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने निकालासाठी वेळ मागितला. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ आरोपी असल्याने याच्या सुनावणीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात होती.

हा स्फोट २९ सप्टेंबर २००८ रोजी झाला होता. ज्यात ६ जणांचा मृत्यू, तर १०० जण जखमी झाले होते.

या प्रकरणाचा निकाल पीडित कुटुंबाबरोबरच देशातील न्यायव्यवस्था व दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी धोरणांसाठी महत्वाचा असेल. मालेगाव स्फोटाने धार्मिक व सामाजिक तणाव वाढवला होता.

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांची काही दिवसांपूर्वीच बदली झाली होती.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली